तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 2 March 2018

शिष्यवृत्तीसाठी बॉण्डची सक्ती नाही छात्रभारतीच्या मागणीला यश


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि ०२
शिष्यवृत्तीपात्र मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपर (बॉण्ड) लिहून घेण्याच्या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर, अखेर सामाजिक न्याय विभागाने सक्ती नसल्याचे जाहीर केले आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिष्यवृत्तीसाठी बॉण्डच्या सक्तीला विरोध केला होता. 

एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., एस.बी.सी. आणि व्ही.जे.एन.टी. या मागास प्रवर्गातील शिष्यवृत्तीपात्र लाखो विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क न भरल्यास भारतीय दंड विधानानुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहू असे १०० रुपयांचे हमीपत्र लिहून घेतले जात होते. शिष्यवृत्तीमध्ये सरकारने केलेल्या अभुतपूर्व गोंधळानंतर सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली होती. छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव, आयुक्तांना याबाबतचे निवेदन दिले होते. 

शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इ. योजनांतर्गत अनुज्ञेय लाभ अदा करण्याकरिता विद्यार्थी व पालकांनी द्यावयाचे बंधपत्र साध्या कागदावर द्यावे, असे छात्रभारती संघटनेला दिलेल्या लेखी उत्तरात समाजकल्याण विभागाच्या सहआयुक्तांनी म्हटले आहे. शिष्यवृत्तीपात्र मागास प्रवर्गातील राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती छात्रभारतीच्या मुंबई उपाध्यक्षा अमरीन मोगर यांनी दिली आहे.

आधिक माहितीसाठी संपर्क 
सचिन बनसोडे- 9594827100

No comments:

Post a Comment