तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

सरकार विरोधी आंदोलन,बळी माञ गाढवाचा गेला


फुलचंद भगत

वाशिम दि.११:-
राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार सत्तारूढ आहे. तरीही सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सरकार विरोधात आंदोलने करत आहे. मात्र आंदोलनाचे भान हरपल्यानंतर काय होते याची प्रचिती शुक्रवारी मानोरा येथे शिवसेनेच्या आंदोलनात आली. या आंदोलनात एका गाढवाला सहभागी करून त्याची ओढताण झाल्याने या बिचाऱ्या गाढवाला आपला प्राण गमवावा लागला. राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार सत्तारूढ आहे. तरीही सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सरकार विरोधात आंदोलने करत आहे. मात्र आंदोलनाचे भान हरपल्यानंतर काय होते याची प्रचिती शुक्रवारी मानोरा येथे शिवसेनेच्या आंदोलनात आली. या आंदोलनात एका गाढवाला सहभागी करून त्याची ओढताण झाल्याने या बिचाऱ्या गाढवाला आपला प्राण गमवावा लागला.
मानोरा तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी केले. मोर्चामध्ये सरकारविरोधी घोषणांचे फलक लावण्यासाठी गाढवाचा वापर करण्यात आला होता. मोर्चा निघाल्यानंतर गाढव सर्वांत पुढे होते. मात्र, कार्यकर्त्याना जास्तच हुरूप आल्याने त्या मुक्या जिवाचीही ओढताण सुरू झाली. त्यातच ते बिचारे गाढव जमीनीवर कोसळले व त्याने प्राण सोडला. गाढवाच्या मालकाला मोबदला देवून प्रकरण मिटवले गेल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, शिवसेनेच्या या मोर्चाला गाढवपुराणाचा अध्याय जोडला गेला आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment