तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे - प्राचार्य डॉ सातपुते


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ :  येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देण्याची परंपरा असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रंथालयास ग्रंथभेट दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम होते तर प्रमुख पाहूणे ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर हे होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांनी ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे असल्याचे मत व्यक्त केले.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देण्याची परंपरा असून यात सर्वच घटक हिरीरिने भाग घेतात, त्यात आज प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांनी 2875 रूपयांचे ग्रंथालयास भेट दिली व  सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीस रोख मदत दिली.
यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment