तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

पालम येथे भारिप बहुजन महासंघच्या वतीने आंदोलन यशस्वी


अरुणा शर्मा

पालम :- भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसिल कार्यालयावर विविध मागण्यासाठी धरणे व निदर्शने आंदोलन दि. 3 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता पेठपिंपळगाव चौकातुन तहसील कार्यालयावर रॉली काडुन विविध मागण्याचे निवेदन मा.तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी धरणे आंदोलनाचे नेतृत्व पालम तालुका अध्यक्ष कैलास झुंजारे यांनी केले यावेळी यांच्या प्रमुख मागण्या अस्या कि होत्या भिमा कोरगाव दंगलीने मुख्यसुत्रधार मिलिंद एकबोटे, संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना तात्काळ अटक करा, 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी आलेल्या कार्यकर्त्याची वाहने फोडली व जाळण्यात आली त्या सर्व नुकसान झालेल्या वाहनधारकाचे नुकसान भरपाई देण्यात यावे, गायरान जमीनीचे पट्टे कसणाऱ्याला, गायरान धारकांच्या नावे करण्यात यावे, विध्यार्थाना निर्वाह भत्ता दरमहा  रुपये 1500 करण्यात यावा,ओ.बी.सी./ व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. या प्रवर्गाच्या विध्यार्थाना शिष्यवृत्ती वाढवून सरसकट 100% करावी., सामाजिक अर्थ सहाय्य, श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरागांधी, इ.योजनेतील गलथान मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्याचे निवेधन देण्यात आले हे धरणे आंदोलन यशस्वि करण्यासाठी कैलास झुंजारे, रावसाहेब वावळे, अरविंद थिटे, भिमराव रायबोळे, आश्रोबा निळे, नाग नाथ भालेराव, रामजी निळे, गौतम हानवते, जय हानवते, सुमेध वाघमारे, अविनश हानवते आदी सह भारिप बहुजन महासंघाचे तालुक्यातील कार्यक्रर्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment