तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

बीड- परळी मार्गावर सायंकाळनंतरच्या बस फेऱ्या  वाढविण्याचे आगारप्रमुखांचे अश्वासन

भाजप शिष्टमंडळाने दिले मागणीचे निवेदन

परळीवैजनाथ(प्रतिनिधी)  : 

          बीड- परळी मार्गावर सायंकाळनंतरच्या बस फेऱ्या लवकरच  वाढविण्याचे अश्वासन परळी एसटी आगाराचे आगारप्रमुख यांनी दिले. या बाबत भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. राञी 8.30 वा. नंतर बीडहून परळीकडे येणाऱ्यांसाठी व राञी 7.30 वा. नंतर परळीहून बीडला जाणाऱ्यांसाठी लवकरच बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी शिष्टमंडळास दिली. 

   परळी बस डेपोतून सायंकाळी 5.30 वा. च्या नंतर बीड येथे जाण्यासाठी कोणतीही बस नाही. यामुळे अनेक लोकांना ञास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. तसेच बीडहून परळीला येण्यासाठी राञी 8.15. वा. नंतर कोणतीही बस उपलब्ध नाही. यामुळे परळीहून राञी बाहेर गावी जाणाऱ्यां व बीडहून राञी 8.30 वा. नंतर परळीकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणी तोंड दयावे लागत होते. काही वेळेस अशा प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागलेला आहे. ही बाब अनेक लोकांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंञी तथा ग्रामविकासमंञी ना. पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या निदर्शनास आणु दिली. त्याची तातडीने दखल घेवून भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी आपल्या शिष्टमंडळासह परळी आगार प्रमुखांची भेट घेवून प्रवाशांच्या अडीअडचणी सांगितल्या. यावर या मागण्यांची दखल घेवून आगार प्रमुखांनी तातडीने या बस सेवा सुरू करण्यात येतील असे सांगितले. 

यावेळी भाजपाचे सरचिटणीस उमेश खाडे, दिनदयाळ बॅंकेचे संचालक ऍड. राजेश्वर देशमुख, राजेंद्र ओझा, ऍड. अरूण पाठक, अनिस आग्रवाल,  युवा मोर्चाचे सरचिटणीस मोहन जोशी, सचिन गित्ते,   सतिश केंद्रे  प्रशांत कराड, योगेश पांडकर, गोपी कांगणे, नितिन मुंडे, खदीर भाई, कासीम भाई, नरेश पिंपळे, बंडू कोरे, धनराज कुरील, वैजनाथ रेकणे आदिंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Show quoted text

No comments:

Post a Comment