तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

दारूसाठी पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; पतीवर गुन्हा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने पतीने चिडून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी परळी तालुक्यातील डाबी येथे घडली. रात्री उशिरा पोलिसांनी दारुड्या पतीस ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी शोभाबाई तुकाराम मुंडे (रा. डाबी, ता. परळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्या घरात असताना त्यांचा पती तुकाराम लिंबाजी मुंडे हे तिथे आला आणि दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी करू लागला. शोभाबाई यांनी त्यास नकार दिला. याचा राग आल्याने चिडून तुकारामने बाजूला ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि पत्नी शोभाबाईच्या डोक्यात तीन वार आणि नंतर डाव्या कानावर एक वार केला. या प्राणघातक हल्ल्यात शोभाबाई गंभीर जखमी झाल्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपी तुकाराम लिंबाजी मुंडे याच्यावर परळी ग्रामीण पोलिसात कलम ३०७, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सपकाळ हे करत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा आरोपी तुकाराम मुंडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment