तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

शांतीच्या आधारे परमात्मा क्रांतीचा संदेश देतात - ब्रह्माकुमार दशरथभाईजीमान्यवरांच्या उपस्थितीत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंबाजोगाई येथील शाखेच्या इमारतीच्या जागेचे भूमीपुजन

-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) ओमशांती जगमे लायेगी क्रांती असे सांगुन बीना शांती क्रांती होवू शकत नाही शांतीच्या अधारे परमात्मा क्रांतीचा संदेश देतात आनंद असल्यास उदासिनता राहणार नाही. आनंदाच्या विरोधात कोणताच शब्द नाही. जगात भरपुर दुःखे आहेत, व्यसनाधिनता वाढत आहेत. अशा काळात 
माणसाला शांती हवी आहे. भौतिक सुख-सुविधा असल्यातरी माणसाला समाधान नाही. त्यामुळे माणसाच्या आतिल शक्ती सुधारली पाहिजे, शांत स्वरूप असणे आवश्यक आहे, माणसात सहन शक्ती आवश्यक आहे. ओमशांतीद्वारे खर्‍या अर्थाने मनुष्याला परमात्म्याचे दर्शन होईल,सुख-शांती लाभेल,समाधान लाभेल असे प्रतिपादन ब्रह्माकुमार दशरथ भाईजी (पुणे) यांनी केले. ते अंबाजोगाईत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ,मुख्यालय माऊंट आबू,शाखा अंबाजोगाईच्या नूतन भव्य इमारतीच्या जागेच्या भूमीपुजन प्रसंगी बोलत होते.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय,मुख्यालय माऊंट आबू,शाखा अंबाजोगाईच्या नूतन भव्य इमारतीच्या जागेचे भूमीपुजन रविवार, दि.25 फेब्रुवारी 2018 रोजी  दुपारी 4.30 वाजता वाघाळा रोड, योगेश्वरी नगरीच्या मागे करण्यात आले. भूमीपुजन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उदगीर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी महानंदा बहेनजी या होत्या तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून ब्रह्माकुमार दशरथभाईजी (पुणे), अंबाजोगाई केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता बहेजनी,विजय प्रकाश ठोंबरे,नॅचरल शुगर अ‍ॅड अलाईड इंडस्ट्रीज लि.,रांजणी चे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी.बी.ठोंबरे, माजी आ.पृथ्वीराज साठे,नगरसेवक कमलाकर कोपले, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव काळे व अर्किटेक्ट आशिषजी सोमाणी यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले.या प्रसंगी प्रस्तावना करताना अंबाजोगाई केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता बहेजनी म्हणाल्या की, अंबाजोगाई केंद्राची स्थापना 22 डिसेंबर 1983 साली करण्यात आली.आज माणसांत तणाव वाढत असल्यामुळे ओमशांती हे शांतीचे स्थान होत आहे.ब्रह्माकुमारीच्या तपस्याचे व्हायब्रेशन शांतता निर्माण करतात. केंद्रामध्ये आलेल्या व्यक्तींना आनंद देण्यासाठी जागेची कमतरता भासत होती.   त्यामुळे नविन वास्तूची आवश्यकता असल्याने 28 एप्रिल रोजी केंद्रासाठी जागा निश्चित केली. 24 ऑगस्ट रोजी जागेचे खरेदीखत (रजिस्टरी) या कामी ब्रह्माकुमारीच्या प्रत्येक बंधु भगिनींच्या शुभकामना कामी आल्या या जागेचे श्रेय ओमशांती परिवारातील प्रत्येक सदस्याची आहे. ईश्वरीय प्रेमाचे मुल्य होवू शकत नाही म्हणून त्यांच्या भावनांचा आदर करते आज रोजी सर्वांच्या उपस्थितीत जागेचा भूमीपुजन समारंभ होत असल्याचे अंबाजोगाई केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता बहेजनी म्हणाल्या.या प्रसंगी बी.बी.ठोंबरे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात सांगितले की, सामाजिक स्थिरता आणण्याचे काम, सुख समृद्धीसाठी ओमशांती आधार असून सर्वस्वी समर्पनाची भावना व ऊर्जा देण्याचे काम ओमशांती करते असे ठोंबरे यांनी सांगितले. माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी अध्यात्मासोबत संस्कार केंद्राची अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी आ.संगीताताई ठोंबरे व राजकिशोर मोदी यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन ही करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना ब्रह्माकुमारी महानंदा बहेनजी यांनी विश्व विद्यालय समाजसेवा व आत्मोन्नतीचे कार्य करते.श्रेष्ठ बोल आणि कर्म शिकविण्याचे काम या केंद्रातून होते.सुंदर संदेश प्राप्त करण्यासाठी नविन वास्तूचे भूमीपुजन होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.कु.श्रद्धा दरगड हिने स्वागतपर नृत्य सादर केले.अंबाजोगाई केंद्राच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुञसंचालन जी.जी.रांदड यांनी केले तर उपस्थितांचे आभार बालाजी मुंडे यांनी मानले.यावेळी शहरातील मान्यवर नागरिक,बंधु-भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment