तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 22 March 2018

माधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच

अक्षय पाटील,औरंगाबाद
एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी खरे बोलतील तर नवलच. म्हणे स्वामिनाथन आयोगाची स्थापना भाजपच्या काळात झाली होती. आता मा.अटल बिहारी वाजपेयी २२मे २००४ रोजी सत्तेतून पायउतार झाले आणि १८नोव्हेंबर २००४ ला "राष्ट्रीय किसान आयोगाची" प्रा. एम एस स्वामिनाथन ह्यांच्या आयोगाची स्थापना झाली. त्यामुळे इथेच भंडारी तुमच्या वक्तव्याचे पितळ उघडे पडते.
आणि म्हणे की शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी आयोगाच्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत?? अरे बाबा थोडे वाचण्याचे कष्ट घेतले असते तर तुझ्या लक्षस्ट असले असते की "राष्ट्रीय किसान आयोग:स्वामिनाथन आयोगा"ची स्थापनाच मा.शरद पवार साहेबांनी केली. त्याच्या बहुतांश शिफारशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी देखील केली व त्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात पाहायला मिळाले.

ह्या आयोगाने ४रिपोर्ट सादर केले व त्यातून विविध शिफारशी केल्या व त्यातील बहुतांश स्वीकारल्या गेल्या ते खलील प्रमाणे:

जमीन वाटपासंदर्भात केलेल्या शिफारशी स्वीकारून
👉🏻सुपीक व वन्य जमिनी उद्योगांना अकृषिक करणयास घेण्यास निर्बंध आणण्यात आले.
👉🏻१८डिसेंबर २००६ ला वनहक्क कायदा आणून वर्षानुवर्षे जंगलात वास्तव्य असणाऱ्या आदिवासी आणि भटकयस जमातींना जमिनी प्रदान करण्यात आल्या.
👉🏻शेतकऱ्यांच्या जमिनींना संरक्षण देऊन "जमीन अधिराहन कायदा" आणला व शेतकऱ्याला ५पट मोबदला मिळवून दिला.

सिंचन:
आयोगाने सुचविल्या प्रमाणे ११व्या पंचवार्षिक योजनेत लघु व सूक्ष्म सिंचन क्षेत्रात भरीव तरतुदी, भूजल पातळी वाढविण्याकरिता अनुदान देण्यात आले.

कृषी उत्पादन:
👉🏻उत्पादन वाढविण्याकरिता भरीव कार्याची शिफारस स्वीकारून बियाणे संशोधनासाठी कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली व संशोधनास सुरवात करून क्रांतिकारक उत्पादन वाढविण्यात आले.
👉🏻पूर्वोत्तर ह्या अपारंपरिक भागातील राज्यांमध्ये शेतीमध्ये प्रोत्साहन देऊन प्रचंड कृषीउत्पादन वाढविण्यात आले.
👉🏻राष्ट्रीय पातळीवर माती व जल परीक्षण केंद्रे उभारण्यात आली.

कर्ज व विमा:
👉🏻छोट्या शेतकऱ्यांना लागणारे वेळोवेळी अल्पमुदत पीककर्ज सुरवातीला ४%दराने व नंतर ठराविक रकमेसाठी बिनव्याजी देण्याची व्यवस्था केली.
👉🏻वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती,दुष्काळवेळी पीककर्जवरील व्याजमाफ करण्याची तरतूद केली.
👉🏻प्रथमच किसान क्रेडिट कार्ड आणले गेले.

अन्नसुरक्षा:
२००४-०५पर्यंत २८%लोक हे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न असणारे होते, आणि उपासमारीची प्रमाण वाढलेले होते, त्यामुळे देशांतर्गत उत्पादनास वाव देऊन २०१३मध्ये अन्नसुरक्षा कायदा आणण्यात आला.

स्पर्धात्मक शेती:
👉🏻सहकार शेतीला प्राधान्य देण्यात येऊन कृषी क्षेत्रात सहकारी योजनांना वाव देण्यात आला.
👉🏻प्रथमच पिकांची किमान आधारभूत किंमत केंद्रसरकारच्या वतीने स्वीकारण्यात आल्या.
👉🏻धान्य उत्पादन साठविण्यासाठी गोदाम व कोठारे उभारण्यात येऊन साठवण क्षमता राष्ट्रीय पातळीवर वाढविण्यासाठी वेअर हाऊस ला अनुदान देण्यात आले.

एवढ्या शिफारशी स्वीकारून व त्यावर आधारित विविध योजना अंमलात आणून देखील आपल्याला मा.शरद पवार यांनी स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत असे वाटत असेल तर नक्कीच मला वाटते,
की मागे प्रसाद लाड ह्यांना विधानपरिषद देऊन आपली हुकलेली संधी शरद पवार ह्यांच्यावर टीका करून पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
किंबहुना कित्येक वर्षांपासून पवार साहेबांवर राजकीय आकस ठेवणारा एक वर्ग आहे , जो सातत्याने बिनबुडाचे आरोप आणि टीका करत असतो. त्यामुळे माधव भंडारीची ही टीका पण केवळ पोटशूळच मानवी लागेल.
-अक्षय पाटील
पवार साहेबांचा कार्यकर्ता.

No comments:

Post a Comment