तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आधिवेशनासाठी नवी दिल्लीला रवाना..


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आधिवेशन नवी दिल्ली येथे शुक्रवार दि.16, 17, 18 रोजी या तीन दिवसा होणार आहे.
         नवी दिल्ली येथे होणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र काँग्रेसचे स्विकृत प्रतिनिधी म्हणून काँग्रेस ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र चे प्रभारी मोहन प्रकाश व खा.राजीव सातव यांनी दुरध्वनी वरून निमंत्रीत केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहून गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते बाबुराव मुंडे यांना दि.16 रोजी सह भोजनासाठी निमंत्रण केले आहे.
     नवी दिल्ली येथे होणार शुक्रवार दि.16 रोजी पासून तीन दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन  माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, खा.राजीव सातव यांच्या समवेत होणाऱ्या अधिवेशनात परळीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे हे प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्र काँग्रेस तफ यांची निवड करण्यात आली आहे.
        काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे बँगलोर, तिरुपती, हैदराबाद, कलकत्ता, कोचीन, असे अनेक अधिवशनात ते सहभागी झालेले आहेत. दिवगंत काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या सोबत ही त्यांनी अधिवेशनात सहभाग घेतला आहे.

No comments:

Post a Comment