तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

बागझरी येथील सरपंच विवेकानंद सुभाष लहाने यांच्यासह सर्व सदस्यांचा ना.धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादीत प्रवेश

अंबाजोगाई दि.01.......................अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली असुन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन बागझरी येथील सरपंच विवेकानंद सुभाष लहाने यांच्यासह सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढाईत बाझरी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात असल्याचे खोटे दावे करणार्‍या भाजपाला बागझरी येथील सरपंच, सदस्यांनी चांगलाच धसका दिला असुन, काल सरपंचासहीत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवनिर्वाचित सरपंच विवेकानंद लहाने यांचे व सदस्य गिता लहाने, जयश्री आचार्य, कल्पना बोंबडे, अश्विनी फड, बन्सी आचार्य, धनंजय साळंके, दत्ता कोचे यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 

यावेळी भाजपा खोटे दावे देण्यात अव्वल क्रमांकावर असल्याची भावना नवनिर्वाचीत सरपंच विवेकानंद लहाने यांनी व्यक्त केली आहे. तसेच गावाच्या विकासासाठी ना.धनंजय मुंडेंच काम करू शकतात अशी ही भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.  यावेळी बालाजी फड, लिमराज लहाने, दयानंद बोंबडे आदींनी परिश्रम घेतले. 

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

No comments:

Post a Comment