तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा विटंबना प्रकरणी परळीत समाजकंटकावर कारवाईची मागणी


तीव्र निषेध करत  निवेदन सादर
परळी वैजनाथ /प्रतिनिधी...
       औरंगाबाद येथे झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा विटंबनेच्या निंदनीय घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा विटंबना प्रकरणी  परळीतही तीव्र पडसाद उमटले. सावरकरप्रेमी युवक व नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा विटंबनेचे निंदनीय  कृत्य करणाऱ्या विकृत समाजकंटकावर कडक  कारवाईची मागणी करण्यात आली.
         औरंगाबाद येथील  समर्थनगरमधिल  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची काल शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करण्याचा निंदनीय प्रकार केला.  या घटनेचा परळीत सावरकरप्रेमी युवक व नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी सुधिर आयचित, दत्ताभाऊ कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, योगेश पांडकर, महेश बागवाले, सचिन जोशी,राजेंद्र दगडगुंडे, शेख जमिल, अँड.संजय डिघोळे, वैजनाथ जोशी,जितेंद्र नव्हाडे, अँड.अरूण पाठक, दिनेश लोंढे, चारूदत्त करमाळकर, किरण धोंड, गिरीष प्रयाग, पिरमोद औटी, प्रशांत रामदासी,सचिन शिंदे, अविनाश जोशी, ओंकार कुलकर्णी,प्रमोद औटी, रंगनाथ कुलकर्णी,नितीन कुलकर्णी, विशाल पाठक, सतिश कुलकर्णी, प्रविण तोताडे, विठोबा चाटुफळे, जयराम गोंडे,प्रशांत नाईक,अविनाश नव्हाडे, किशोर कुलकर्णी, पञकार अनंत कुलकर्णी,दिपक जोशी,केशव बडवे,अक्षय पत्की,सचिन खडके,विवेक पाठक,सुनिल चाटुफळे, प्रमोद जोशी, प्रसाद खोडवे आदींसह सावरकरप्रेमी नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment