तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

प्रति, संपादकसाहेब आंबेडकरी चळवळ बचाव आंदोलन मुंबईला जाणार शेकडो कार्यकर्ते

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:-आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यापासून आंबेडकरी कार्यकर्त्यांचे शोषण सुरू केले आहे. सर्वात पहिला बळी घेतला तो रोहित वेमुलाचा त्या नंतर दलित नेता चंद्रशेखर आजाद यांच्यावर रासुका लावला, पँथर सेनेचे संघटना प्रमुख सतीश पट्टेकर, प्रमुख महाराष्ट्र दीपक केदार, रवी ननावरे यांना तडीपार करण्यात आले, भीमा कोरेगाव आंदोलनानंतर कोंबिंग ओपेरेशन करून विध्यार्थी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर अतोनात हाल करत त्यानाच्यावर गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, नांदेडला याच लाठीचार्ज मध्ये पोलिसांकडून योगेश जाधवची हत्या झाली या अन्यायाविरोधात रस्त्यावरच्या लढाई शिवाय पर्याय नाही म्हणून आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या सरकारच्या विरोधात दि. 06 मार्च 2018 रोजी दुपारी 1 वाजता आजाद मैदान मुंबई येते तीव्र निदर्शने छेडण्यात येणार आहे.
विविध 10 मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून यात पँथर सेनेचे संघटना प्रमुख सतीश पट्टेकर व प्रमुख महाराष्ट्र दीपक केदार हे नेत्रत्व करणार आहेत. संख्येने सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र सचिव वृषाली सूर्यवंशी यांनी केले आहे. या आंदोलनात भीम आर्मी, रिपब्लिकन युवा मोर्चा, आंबेडकरी क्रांती दल, इंडियन सोशल मोव्हमेंट, पीपल्स व्हॉइस, युवा पँथर, युवक पँथर, ब्लू पँथर, परिवर्तन लढा, मजलीस-ए-इत्तेहाद फ्रंट, समाज कल्याण कृती समिती इत्यादी तरुणांच्या संघटना सामील होणार आहेत.
पोलिसांच्या आडून कार्यवाया काय करताय "गोळ्या झाडा" हे सांगण्यासाठी व  हुकूमशाही सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्यासाठी पँथर सेनेचे सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातुन शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याची माहिती पँथर सेनेचे सेनगांव तालुकाध्यक्ष विनोद खंदारे यांनी तेजन्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी बोलतांनी दिली.

No comments:

Post a Comment