तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

ज्येष्ठ संपादक तुळशिराम मुंडे यांचे निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांना बंधुशोक

पळळी वैजनाथ (प्रतिनिधी)
       तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील ज्येष्ठ संपादक तुळशिराम अंबाजी मुंडे  यांचे आज दि.05 मार्च 2018 सोमवार रोजी दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.तुळशिदास मुंडे यांचे मुळ गावी राहत्या घरी सकाळी 07 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी 65 वर्षे होते. परळी तालुक्यातील पत्रकारितेतला कडकडाट काळाच्या पडद्याआड.  आज सकाळी त्यांच्यावर टाळ, मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व अंत्यसंस्कार करण्यात आले.

         सा.कडकडाटचे मुख्य संपादक कै.तुळशिराम अंबाजी मुंडे, रा.कन्हेरवाडी ता.परळी वैजनाथ, जि.बीड यांचे आज दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने मुंबई येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात ही आले होते. सा.कडकडाटचे संपादक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. तसेच बीड जिल्हा काँग्रेसचे सचिव होते. परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथे अनेक काळ सरपंच व अनेक पद ही त्यांनी भुषविले आहे.याकाळात परळी परिसरात त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून विविध शैक्षणीक, सांस्कृतिक अनेक कामात त्यांचा सहभाग होता.  कन्हेरवाडी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांचे ते लहान बंधू होते. माऊली अनुराधा प्रायमरी स्कुलचे सचिव तथा रघुनाथराव विचार मंचचे अध्यक्ष  शैलेश (सावन) तुळशिराम मुंडे यांचे ते वडील होत. अँड.प्रकाश मुंडे, प्रा.सुरज मुंडे यांचे चुलते होत.
      कै.तुळशिराम मुंडे हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण पत्रकारिताते तुळशिदास मुंडे यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तुळशिराम मुंडे यांच्या पाश्चात्य दोन बंधु, पत्नी, दोन मुले, एक मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
    कै.तुळशिराम मुंडे यांच्या पार्थिवावर मुळ गावी कन्हेरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या या अंतयात्रेत सर्व स्तरातील नागरिक, राजकीय, व्यापारी, पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस कर्मचारी व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कै.तुळशिराम मुंडे यांच्यावर कोसळलेल्या दुःखात  तेजन्युज हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.
---
राख सावडण्याचा कार्यक्रम 
       राख सावडण्याचा विधी बुधवार, दि.07 रोजी सकाळी 7 वा. होणार आहे.

1 comment:

  1. भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

    ReplyDelete