तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

ग्रा.पं. कर्मचार्‍यांचा नऊ महिन्याचा पगार थकला, कर्मचार्‍यांचे ग्रा.पं. कार्यालयासमोर काम बंद आंदोलन

नितेश काळे

सिरसाळा (रिपोर्टर)ः- नऊ महिन्यापासुन ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पगार देण्यात आल्या नसल्याने सदरील कर्मचार्‍यावर उपासमारीची वेळ आली. आपल्या पगारासाठी आजपासुन कर्मचार्‍याने कामकाजावर बहिष्कार टाकुन ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. सिरसाळा ग्रामपंचायत अंतर्गत अनेक कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचार्‍यांना गेल्या नऊ महिन्यापासुन पगार देण्यात आला नसल्याने सदरील कर्मचार्‍यांनी पगाराबाबत अनेक वेळा तगादा लावुनही त्यांना पगार दिली गेली नाही. नऊ महिन्याचा पगार थकल्याने कर्मचार्‍यावर उपास मारीची वेळ आली असुन पगार देण्यात यावा यासाठी कर्मचार्‍यांनी कामकाजावर बहिष्कार टाकुन आपल्या न्याय हक्कासाठी आजपासुन ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. यावेळी विश्‍वंभर देशमुख, कानोबा काळे, बाळासाहेब घनघाव, राम हाके यांच्यासह आदिंची उपस्थिती आहे. 

No comments:

Post a Comment