तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

मंगरुळपीर येथे कर्तुत्ववान महिलांच्या सत्काराचे आयोजन


फुलचंद भगत
मंगरुळपीर-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन ग्रुप्स आॅफ वेस्टीज तर्फे मंगरुळपीर तालुक्यातील कर्तुत्ववान गृहीनींचा सत्कार समारंभाचे आयोजन दि.११ मार्च रोजी दुपारी २ वाजता श्री.संत तुकडोजी महाराज प्रार्थना स्थळ,बायपास रोड,मंगरुळपीर येथे केले आहे.ग्रुप्स आॅफ वेस्टीजचे डायरेक्टर आणी अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन असुन या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने महिलांनी ऊपस्थीती दर्शवावी असे आवाहन आयोजक टिमच्या चंदाताई ठाकुर,रौनक थोरात,कु.शुभांगी रघुवंशी आणी कु.कल्याणी शिंदे यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment