तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

बुलढाणा जिल्ह्यांत आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई :दि ३
बुलढाणा जिल्ह्यांत आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ केला. भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे  या मिशनसाठी जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटना यांच्यात एक करारही करण्यात आला आणि जेसीबी मशिन्सचे पूजन केले. संघटनेच्या वतीने 134 जेसीबी प्राप्त होणार असून 4 कोटी क्युबिक मीटर गाळ 2091 साठ्यांमधून काढला जाणार आहे.
जिल्ह्यातील 13 तालुक्यात प्रत्येकी 10 जेसीबी दिले जाणार आहेत. यात डिझेलचा खर्च स्थानिक प्रशासन वहन करेल. महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीच्या या अभियानात एका नवा अध्याय यामुळे जोडला गेला आहे. आमच्या शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन मिळावे, यासाठी अगदी प्रारंभीपासून राज्य सरकारने प्रयत्न हाती घेतले आहेत. जलयुक्तशिवार अभियानाला मिळालेले घवघवीत यश हे प्रचंड प्रमाणात लाभलेल्या लोकसहभागाचे आहे. त्यातून 11 हजारहून अधिक गावे दुष्काळमुक्त झाले आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून खारपाण पट्ट्यासाठी सुद्धा काम केले जात आहे.
जागतिक बँकेचे सहाय्य यासाठी घेतले जात आहे. या सर्व प्रयत्नांतून या 2 वर्षांत महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीचा उद्देश आपण साध्य करू शकू. बुलढाणा जिल्ह्यांत ऐतिहासिक कर्जमाफीच्या माध्यमातून सुमारे 2 लाखांवर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आज लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकार, कार्पोरेट, सामाजिक संघटना आणि लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात  शेतकऱ्यांना आणि राज्याच्या विकासासाठी आपण अनेक नवीन प्रयोग साकारू शकू, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
त्यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी, राज्यातील मंत्री श्री पांडुरंग फुंडकरजी, डॉ. रणजित पाटील आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री शांतीलाल मुथाजी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment