तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 March 2018

सिंधुदुर्गात वेंगुर्ले निवती रॉक.भारतातील पहिली पर्यटन पाणबुडी


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि  १६ सिंधुदुर्गात लवकरच अबालवृद्ध, पूर्ण कुटुंबाला एकत्रित न भिजता समुद्रखालील विश्वाची सैर करता येणार!!!
कोकणकिनारपट्टटीवर जलवहातूकीने पर्यटन व बंदराचा व्यवसायीक विकास यावर चर्चा करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी- सिंधुदुर्ग, श्री उद्य चौधरी यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ९ जानेवारी २०१७ रोजी संबधीत अधीकार्यांच्या बैठकीत आंग्रीया बँक येथील प्रवाळ बेटे विकसीत करण्याऐवजी वेंगुर्ला राँक येथील निवती दिपगृहावर प्रवाळ बेटांवर सिंधुदुर्गचे सागरी विश्व विकसीत करण्याचा मुद्दा मी मांडला आणी त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे
स्वीफ्ट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करी रोखण्यापासून
कासव- डॉल्फीनच्या संवर्धनाचे काम गेली काही वर्षे आम्ही करीत आहोत. शासन दरबारी आम्हा मच्छिमार युवकांच्या कार्याची दखल घेतली गेली .
सिंधुदुर्गचे सागरी विश्व
सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे तर अनवटच जैवविश्व आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्व समुद्रकिनाऱ्यां
चा पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. यात सिंधुदुर्गातील समुद्रात दुर्मीळ अशी मत्स्यसंपत्ती असल्याचे लक्षात आले. जगात काही मोजक्याच ठिकाणी आढळणारे समुद्रीवड, समुद्रीगवत सिंधुदुर्गातील समुद्राच्या पोटात अनेक ठिकाणी आहे. सिंधुदुर्गातील किनारा भागात आतापर्यंत गोळा केलेल्या सर्वेक्षणावरून असे आढळले आहे की, सागरी प्राण्यांचे १९८ प्रकार या भागात आढळले. त्यात स्पंज, समुद्री फूल, समुद्री पंखा, प्रवाळ, विविध प्रकारचे मासे, खेकडे, कासव, जिवंत शेवाळ यांचा समावेश आहे.
निवती रॉक आहे तरी काय
सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पॉट आहेत. यात निवती रॉक सर्वाधिक आकर्षण ठरेल असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची दोन ते तीन बेटे आहेत. पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारले होते. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशामध्ये राहील. कालांतराने त्सुनामीमुळे हे दीपगृह उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे. तेथे काही वर्षापूर्वी स्वीफ्ट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जेवढा गूढ आणि सुंदर दिसतो, त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर तेथील समुद्रविश्व आहे.
निवती रॉकचे अंतरंग
निवती रॉक परिसरात वर दिसणारे खडक म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या खालचा भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोहोचताच तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत.
पाणबुडीच का
बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी पर्यटनासाठी वापरण्याचा भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. अमेरिका, बाली, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये असे प्रयोग झाले आहेत. आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये पाणबुडी पर्यटनासाठी वापरल्याचे@ सांगितले जाते; पण ती पाणबुडी नसून बोटच म्हणावी लागेल; कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरच तरंगते. स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आत जाता येऊ शकते; मात्र स्कूबा डायव्हिंगवर पर्यटकाच्या क्षमता प्रभाव टाकतात. स्कूबच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार १२ वर्षाखालील मुलांना याचा वापर करता येत नाही. वृद्ध, उच्चदाबाचे रुग्ण, महिला याही स्कूबाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. याऐवजी पारदर्शक पाणबुडीमधून सर्व वयोगटातील पर्यटकांना समुद्राच्या पोटात जाऊन हे विश्व अनुभवता येणार आहे.
दृष्टिक्षेपात
पाणबुडी प्रकल्पात वेंगुर्ले ते निवती रॉकपर्यंतचे क्षेत्र विकास टप्प्यात
प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च-४९ कोटी
बॅटरी ऑपरेटेडy पाणबुडीची पर्यटक क्षमता ३०
प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टी - मदरशिप, पाणबुडी, पॅसेंजर ट्रान्स्फर बोट, धक्का
प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याचा कालावधी - ८ ते ९ महिने
निवती रॉक परिसरातील सागरी विश्व - विविध प्रकारचे रंगीत मासे, दुर्मीळ, वैशिष्ट्यपूर्ण सागरी वनस्पती, समुद्राच्या आतील गुहा, देखणा खडकाळ भाग
कसा मिळणार आनंद
पाणबुडी पर्यटनाची सुरुवात वेंगुर्लेतून होणार आहे. येथून पर्यटकांना एक सुसज्ज आधुनिक बोट निवती रॉकच्या दिशेने घेऊन जाणार आहे. हे अंतर ३० ते ४० मिनिटांचे असून या प्रवासात डॉल्फीन दर्शन, सागरी सफर आणि समुद्रातील देखणे नजारे अनुभवता येणार आहेत. निवती रॉकजवळ पोचल्यावर तेथे वेटिंग पिरियड असणार आहे. या काळात त्या भागातील दीपगृह व परिसर न्याहाळता येईल. ३० पर्यटक क्षमतेची बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी समुद्राच्या खाली असेल. ती साधारण पाणबुडीच्या आकाराची बससारखी असेल. त्याच्या बाजूला मदरशिप असेल. येथून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याबरोबरच चार्जिंग व इतर व्यवस्था पुरवली जाईल. पॅसेंजर ट्रान्स्फर बोट पर्यटकांना या पाणबुडीपर्यंत घेऊन येईल. यानंतर पाणबुडी समुद्राच्या पोटातील जैवविविधता दिसेल अशा पद्धतीने फिरणार आहे. याचवेळी स्कूबा डायव्हिंग करणारे सहकारी माशांना या पाणबुडीच्या परिसरात खाद्य टाकतील. त्यामुळे आतील वैशिष्ट्यपूर्ण मासे पर्यटकांना जवळून न्याहाळता येतील. शिवाय आतील प्रवाळे, शैवाल व इतर वनस्पती जवळून पाहता येणार आहेत. सर्व वयोगटातील पर्यटक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती सगळी काळजी घेतली जाणार आहे.

No comments:

Post a Comment