तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

महीलांनी सामाजीक कार्यात पुढे आले पाहीजे :- अँड.रुपाली राऊत

अकोला:- महीला सशक्तीकरण व सबळीकरणाकरीता महीलांनी सक्षमपणे पुढे आले पाहीजे.समाजा मध्ये चाललेल्या कुप्रथा,अनिष्ट रिती,स्ञीभ्रुण हत्या,हुंडा बळी,बाल विवाह सारख्या बाबींना वेळीच पायबंद घालणे काळाची गरज आहे.प्रत्येकांनी कायदा विषयक माहीतीची जनजागृती केेली पाहीजे त्याकरीता महीलांनी सामाजीक कार्यात पुढे आले पाहीजे असे मार्गदर्शक मत अँड.रुपाली राऊत यांनी पातूर येथे महाराष्ट्र पाेलीस बाँईज असाेसिएशन द्वारा आयोजीत जागतिक महिला दिन कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
     यावेळी महाराष्ट्र पाेलीस बाँईज असाेसिएशन संस्थापक रवि वैद्य यांचे आदेशान्वये पातुर शहर कार्यकारीणी ची घोषणा राज्य महिला संघटिका शुभांगीताई लातुरकर यांचे मार्गदर्शनामधे व अकाेला जिल्हा अध्यक्ष निलेश किरतकार,
उपाध्यक्ष महेश गावंडे यांचे समन्वयाने जाहीर केली.                                                           यामध्ये पातुर शहर अध्यक्ष पदी साै.ऊमाताई महल्ले,उपाध्यक्ष यासमिन फिरदाेसअ.कुद्दुस,सचिव मालती पारवेकर,संघटक हर्षा गवई,सरचिटणिसपदी अनिता अमानकर,संध्या जाधव प्रसिद्धी प्रमुख तर हेमा घुगे व गाेकर्णा माेकळकर यांची कार्यकारिनी सदस्य म्हनुन नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र पाेलीस बाँईज असाेसिएशन चे पदाधिकारी,सदस्य तसेच महिला,युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

फुलचंद भगत
मो.9763007835

No comments:

Post a Comment