तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

ठाणे - प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करून फरार झालेल्या नराधमाला पोलिसांनी पकडले आहे. संजय नरवडे (२६) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे.

६ दिवसापूर्वी अंबरनाथ-टीटवाळा हद्दीच्या नालिंबी भागातील डोंगरावर रात्रीच्या सुमारास आपल्या प्रेयसीसोबत असलेल्या गणेश दिनकरची ४ गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. नंतर आरोपी संजयने गणेशच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपीबाबत पोलिसांकडे कुठलीही माहिती नव्हती. या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी पीडित तरुणीने केलेल्या वर्णनावरून आरोपीचा स्कॅच जारी केले होते. 

या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची ३ पथके तयार केली होती. या भागातील हिस्ट्रीशिटर आणि अमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या आरोपींना पोलीस ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी करत होते. हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले होते. ३ पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस त्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात असताना स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती काढून उल्हासनगरमधील कॅम्प नं. ५ येथून त्याला ताब्यात घेतले. 

आरोपी संजय नरवडे हा पूर्वी रिक्षा चालवत होता. तो मुळ जालना येथील राहणारा आहे. घटनेच्या दिवशी आरोपी संजय हा नालिंबी परिसरातील ३ झाडी येथे बसला होता. त्याचवेळी सायंकाळच्या सुमारास गणेश दिनकर हा त्याच्या प्रेयसीला बुलेटवरून घेऊन जाताना तो आरोपी संजयकडे पाहून हसला. त्यामुळे आरोपी संजयला त्याचा राग आला. बुलेटवरून जाणारा तरूण आपल्याकडे बघुन का हसला? याचा जाब विचारण्यासाठी संजय त्या रस्त्याने गणेशच्या मागे गेला. त्यावेळी गणेश हा प्रेयसीला घेऊन नालिंबी डोंगराच्या जवळील झाडाझुडपात बसला असताना संजय हा त्याठिकाणी गेला. त्याने गणेशला मला बघून का हसलास? असे बोलत त्याच्याशी भांडण सुरू केले. दोघांमध्ये झटापटी झाल्यावर आरोपी संजयने जवळील रिव्हॉलवर काढून २ गोळ्या हवेत मारल्यावर त्याच्याकडे बुलेटची चावी मागितली. ती देण्यास गणेशने नकार दिल्याने संजयने ४ गोळ्या गणेशवर झाडून त्याला जागीच ठार मारले. हा प्रकार गणेशच्या प्रेयसीने पाहिल्यावर तिने संजयला बडबड करण्यास सुरुवात केली. तिचाही राग आरोपी संजयला आल्याने त्याने तिला त्या ठिकाणापासून दाट झाडीत ओढत नेवून, त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करून तो फरार झाला. 

आरोपी संजय त्या ठिकाणाहून पळून जाताना त्याने त्या पीडित तरुणीच्या जवळील रोख रक्कम व सिम कार्ड काढून मोबाईल घेतला. 

पोलिसांनी आरोपी संजय नरवडेला बलात्कार व खुनाचा गुन्हा प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉलवर देखील जप्त केली आहे. संजयने १ वर्षापूर्वी ती रिव्हॉलवर विकत घेतली होती. याशिवाय संजय याच्याविरुद्ध मारामारीचे तसेच अंबरनाथ येथील लोकनगरी येथे एका प्रेमयुगलाला लुटण्यासाठी एका तरुणावर गोळीबार करीत त्याला जखमी केले होते. तो गुन्हा देखील उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास कल्याण तालुका पोलीस करीत आहे. 

No comments:

Post a Comment