तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 March 2018

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेस राज्यस्तरीय प्रतिबींब वार्षिक अहवाल स्पर्धेत औरंगाबाद विभागातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक


सहकार भारती आणि सहकार सुंगध दरवर्षी करते राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेचे आयोजन

-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) सहकार भारती आणि सहकार सुगंध आयोजित राज्यस्तरीय प्रतिबींब वार्षिक अहवाल स्पर्धेत देवगिरी (नागरी बँका) विभागातून दीनदयाळ नागरी सहकारी बँकेस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.बँकेच्या या सातत्यपुर्ण व स्पृःहणीय कामगिरीबद्दल सहकार भारतीच्या वतीने नुकतेच राज्याच्या मंत्री महोदयांच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा पारीतोषिक देवून गौरव करण्यात आला.

“बिना संस्कार नही सहकार" हे ब्रिदवाक्य घेवून सहकार भारती ही संस्था सहकारी संस्थांच्या वृद्धी व शुद्धीसाठी 1978 पासुन कार्यरत आहे. सहकार भारतीचे संस्थापक प्रणेते स्व.लक्ष्मणराव इनामदार यांचे 2017-18 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सहकारी भारतीचे मुखपत्र असलेल्या “सहकार सुगंध" या मासिकाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका व पतसंस्था यांच्या वार्षिक अहवालांची स्पर्धा घेण्यात येते.ही स्पर्धा आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये ही घेण्यात आली. या स्पर्धेत औरंगाबाद (देवगिरी प्रांत) विभागातून दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वार्षिक अहवालास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सदरील पारितोषिकाचे वितरण नुकतेच सोलापुर येथे झालेल्या विशेष समारंभात करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोउद्योग मंत्री ना.सुभाषबापू देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंञी दर्जा प्राप्त) ना.शेखर चरेगावकर,   सोलापुरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.उदयराव जोशी,महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था, फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, सहकार सुंगधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांच्यासहीत सहकार भारती व सहकार सुंगधचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर,बँकेचे सहाय्यक सर व्यवस्थापक माधव कपिलेश्वर,प्रतिभा गोस्वामी,पंकज कुलकर्णी आदींनी सदरील पुरस्कार स्विकारला.पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे होते.यापुर्वी ही बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा मराठवाडा विभागातून बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व पदमभुषण वसंतदादा पाटील अॅवार्ड (2014), महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा बेस्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान (2014),बँकिंग फायनान्सचा पुरस्कार
(2016),युवक मुद्रा राज्यस्तरीय सहकारी बँका प्रतियोगिता पुरस्कार (2000),मेरीट स्टेट्स अॅवार्ड,तसेच
आर्थिक वर्ष 2013-14 व 2014-15 साठीच्या अहवाल स्पर्धेतही पुरस्कार मिळाले आहेत.
यासोबतच विविध मान्यवर संस्थेचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
----------------------------

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून दीनदयाळ बँकेची आर्थिक क्षेञात वाटचाल-बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई हेबाळकर
-----------------------------
आर्थिक वर्ष 2016-17 साठीच्या अहवाल स्पर्धेत मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर म्हणाल्या की,आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो.या जाणिवेने  अंबाजोगाईकरांना गेल्या 16 वर्षापासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे.काळासोबत वाटचाल करताना ग्राहक हिताकरीता नवनवे बदल,तंञज्ञान स्विकारून दर्जेदार बँकिंग सेवा व सर्व बँकींग सुविधा पुरविण्याचे काम बँक करते.ग्राहकांचा वेळ वाचावा,तात्काळ निधी उपलब्ध व्हावा याकरीता मोबाईल बँकींग (आयएमपीएस) ही सेवा ही बँक देते.
बँकेच्या सर्वांगिण प्रगतीत कर्जदार, ठेवीदार,ग्राहक व हितचिंतक तसेच दीनदयाळ बँकेच्या संचालक व राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले, संचालक सर्वश्री प्राचार्य रा.गो.धाट,डॉ.दि.ज.दंडे,गौतमचंद सोळंकी, पुरूषोत्तम भुतडा, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, गोविंद कुडके, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, बिपीन क्षिरसागर, अ‍ॅड.मकरंद पत्की, प्राचार्य किसन पवार, जयवंत इटकुरकर (कुलकर्णी), तज्ञ संचालक अ‍ॅड.अशोक कुलकर्णी,भीमा ताम्हाणे (सनदी लेखापाल) व मुख्यकार्यकारी आधिकारी,सर्व शाखाधिकारी, अधिकारी,कर्मचारीवृंद यांचे अनमोल योगदान असल्याचे बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयूताई हेबाळकर यांनी यावेळी नमुद केले.
  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment