तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

मंगरुळपीरमध्ये संभाजी भिडेला अटक करन्याची मागणी


फुलचंद भगत-मंगरुळपीर

भिमाकोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे याला मंगरुळपीरमध्ये अटक करन्याच्या मागणीसाठी दि.४ मार्च रोजी बहुजन समाज पार्टीने पोलिस अधिक्षक वाशिम यांना लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
दिनांक १ जानेवारी रोजी भिमाकोरेगाव येथे दंगल घडविल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले संभाजी भिडे यांचा दि.७ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.भिडे यांचेवर दंगल व देशद्रोहाचे गुन्हे दाखल असतांना तसेच सदर गुन्हे हे भडकावु भाषण दिल्याबाबत दाखल असतांनाही त्यांचा भाषणाचा कार्यक्रम मंगरुळपीर येथे दि.७ मार्चला आयोजित केला आहे.या कार्यक्रमात सुध्दा भिडे हे आपल्या भडकावु भाषणाने वाशिम जिल्ह्यात नागरिकांना दंगल भडकवन्यास परावृत्त करु शकतात असा आरोप बहूजन समाज पार्टी वाशिम यांनी केला असुन भिडे यांचा भाषणाचा कार्यक्रम होवु नये याची प्रशासनाने ऊपाययोजना करुन संभाजी भिडे यांना मंगरुळपीरमध्ये अटक करावी अशी मागणी बसपाच्या वतीने वाशिम पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनावर बसपा जिल्हाध्यक्ष वाशिम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment