तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

टोकवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर ग्रा.पं. व वरद गणेश मंडळाचा संयुक्त उपक्रमपरळी वैजनाथ /प्रतिनिधी.....
    ग्रामपंचायत  व गणेश मंडळ यांच्या  संयुक्त विद्यमाने टोकवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबिराला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या वेळी महिला बचत गटांना प्रोत्साहनपर बक्षिस वितरण करण्यात आले.
     जागतिक महिला दिनानिमित्त टोकवाडी येथे सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या पुढाकाराने महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डाॅ. शालिनीताई कराड, डाॅ.रंजना घुगे, डाॅ. नेहा शेख यांनी महिलांना  आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वरद गणेश मंडळाच्या वतीने गावातील सतरा महिला बचत गटांना प्रोत्साहनपर बक्षिस वितरण करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांनी केले. यावेळी डाॅ. राजाराम मुंडे यांनी जागतिक महिला दिन व पार्श्वभूमी सांगून महिलांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डाॅ. शालिनीताई कराड, डाॅ.रंजना घुगे, डाॅ. नेहा शेख यांनी मनोगत व्यक्त करत स्त्री भ्रूण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी आदींबाबत मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाला ग्रामसेवक होळंबे, दशरथ अबा मुंडे, वरद गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, गावकरी, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment