तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

 भिडेच्या व्याख्यान कार्यक्रमाची परवानगी नाकारन्याची भारिपसह संभाजी ब्रिगेडची मागणी

 फुलचंद भगत-वाशिम

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे बुधवार दि.७ मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराज व बलिदान मास.या विषयावर मनोहर कुलकर्णी उर्फ (संभाजी भिडे)यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन स्थानिक शिवशंभू भक्त प्रतिष्ठान मंगरूळपीर जि.वाशिम च्या वतीने करण्यात आले आहे,परंतु १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार म्हणून संभाजी भिडे वर संपूर्ण महाराष्ट्रात  विविध कलमांनव्ये गुन्हे दाखल आहेत तेव्हा भिडे  व एकबोटे यांना तात्काळ अटक करावी,व मंगरूळपीर येथील भिडेच्या व्याख्यान कार्यकर्माची परवानगी पोलीस प्रशासनाने नाकारावी असे संयुक्त निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना वाशिम जिल्हा भारिप बहुजन महासंघ व संभाजी ब्रिग्रेड वाशीम जिल्ह्याच्या  वतीने भारीपबमसचे जिल्हाध्यक्ष हाजी युसूफ सेठ पुंजानी व संभाजी ब्रिग्रेड जिल्हा अध्यक्ष गजानन भोयर यांच्या नेतृत्वात देण्यात आले,यावेळी जिल्हा महासचिव डॉ नरेश इंगळे,विजय मनवर,ऍड प्रशांत इंगळे,एड मोहन गवई,राजुभाऊ कोंघे, गणेश भोयर सुर्वे,कृष्णा पाटील, यांच्या सह भारिप बमसचे व संभाजी  ब्रिग्रेडचे शेकडो कार्यकते उपस्थित होते...

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment