तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

वाशीम येथे सरपंच संघटनेची कार्यकारीनी जाहीर


फुलचंद भगत
वाशीम - सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी खरोळा येथील युवा सरपंच दीपक खडसे, उपाध्यक्षपदी धानोरा (बु) येथील सरपंच ज्ञानदेव भुतेकर आणि सचिवपदी सुपखेला येथील सरपंच विनोद पट्टेबहादूर यांची बिनविरोध निवड झाली.
    वाशीम पंचायत समितीच्या डॉ. नि.कृ. गोटे सभागृहात मंगळवार, 13 मार्च रोजी सरपंच संघटनेच्या सदस्यांची सभा घेण्यात आली. या बैठकीत सरपंच संघटनेच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. सरपंच संघटनेच्या माध्यमातून सरपंच व ग्रामपंचायतीचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सर्वानी संघटीत होवून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे या सभेत ठरले.
    या सभेत सरपंच संघटनेची कार्यकारणी नवनियुक्त अध्यक्ष दीपक खडसे यांनी जाहीर केली. उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भुतेकर (धानोरा बु.), सौ. ज्योतीताई दीपक सोनोने (देपूळ), सचिवपदी विनोद पट्टेबहादूर (सुपखेला), सहसचिवपदी ईश्वर राठोड (धुमका), कोषाध्यक्षपदी गजानन देशमुख (हिवरा रोहीला), सहकोषाध्यक्षपदी शरद गोदरा (टनका) संघटकपदी रामहरी सावके (खंडाळा), सहसंघटकपदी केशव कव्हर (तामसी), मार्गदर्शक राजू आगलावे (सावंगा), सदस्यपदी मोतीराम राऊत (सुराळा), सोपान अंभोरे (हिस्से बोराळा), सौ. राजामती चंद्रकांत वाकुडकर (वाघोली बु.), वंदना डिगांबर चव्हाण (जांभरुण परांडे), नाथा कड (सावरगाव बरडे), उषार्ता सरनाईक (मोहजा रोड) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीला ईलखीचे सरपंच वसंता राठोड, पांडवउमरा सरपंच सिमा ढोबळे, भटउमरा सरपंच पुंडलीक काळे, चिखली सरपंच वर्षा सुर्वे, राजगाव सरपंच शोभा साहेबराव अहिरे, सोपान अंभोरे हिस्से बोराळा, सुंदरलालबाई राठोड शिरपुटी, उषाताई सरनाईक मोहजा रोड, एकनाथ कड सावरगाव, विष्णू इंगोले शेलगाव, आशा मापारी बोरी, राजामती वाकुडकर वाघोली, पंजाब सोनोने फाळेगाव थेट, लताबाई वाबळे सोंडा, राजेंंद्र पांडुळे ढिल्ली, वर्षा राठोड तांदळी शेवई, चंद्रकला इंगळे साखरा, शांताबाई श्रृंगारे उमरा शमशोद्दीन, धम्मज्योती खडसे ब्राम्हणवाडा, विश्रांती शिंदे जुमडा,  शारदा तुकाराम किनखेडा, पुजा कापसे उमरा कापसे, नंदु चव्हाण बाभुळगाव, शशिकला मनवर काजळांबा यांच्यासह जिल्हयातील अनेक गावातील सरपंच उपस्थित होते.
सरपंच संघटना कोणत्याही पक्षाशी निगडीत राहणार नाही - दीपक खडसे
    सरपंच मंडळींच्या विविध अडचणी सोडविण्यासाठीच सरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सरपंच संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत राहणार नाही. संघटनेच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व गावांचा सर्वागिण विकास करण्यासाठी सरपंच संघटनेचा पुढाकार राहणार असल्याची ग्वाही सरपंच संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक खडसे यांनी या सभेत दिली. लवकरच जिल्हयातील प्रत्येक तालुक्याची कार्यकारणी जाहीर करणार असल्याचा मनोदय दीपक खडसे यांनी व्यक्त केला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment