तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

लोकनेता असावा तर युसूफ सेठ पुंजानी सारखा


फुलचंद भगत-वाशिम

कारंजा (लाड) दि.12-3-18 रोजी वेळ सकाळी 11:30 वाजता नगर परिषद कारंजा व भारिप बहूजन महासंघाच्या वतीने स्थानिक डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक सौंदर्य करनासाठी भुमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मधे पार पडला हे भुमिपुजन भारिप बमसं चे जिल्हाध्यक्ष मा.युसूफ सेठ पुंजानी यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी नारळ फोडल्यावर   कार्यकर्त्याच्या हस्ते  टिकास मारून भुमिपुजन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्यामुळेच युसूफ सेठ हे मनाने किती मोठे आहेत हे लक्षात येत असल्याची प्रतिक्रीया कार्यकर्त्यांमध्ये ऊमटली होती,अशा विविध ऊपक्रमामधुन  ते कार्यकर्त्यांवर किती प्रेम करतात हेही लक्षात येते अशा नेत्याची समाजाला फार गरज आहे हे पुंजाणी कार्यावरून दिसून येते. याबद्दल जिल्हाध्यक्ष युसुफ सेठ पुंजानी यांचे कार्यकर्त्यांनी मनापासुन आभार व्यक्त केले आहे.
तसेच आजच दि.१२ रोजी जिल्हाध्यक्ष युसूफ सेठ पुंजानी यांच्या मनमिळाऊ स्वभावाची, नेतृत्वगुणाची व कर्तृत्वाची दखल घेत  श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी युसूफ सेठ यांना थेट भारिप बमसं च्या प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी दिली आहे. म्हनूनच लोकनेता असावा तर तो युसूफ सेठ पुंजानी सारखा असे गौरवोद्गार कार्यकर्त्यांच्या तोंडून निघत आहेत.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment