तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

राजपिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत व कौतुक


सुभाष मुळे...
---------------------
गेवराई, दि. 1 __ तालुक्यातील राजपिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान पहिल्याच दिवशी 15 विद्यार्थी दाखल झाल्याने विद्यार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले.
        सन २०१८ -19 नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. सिडाम सर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. दरम्यान शाळेत इयत्ता पहिली प्रवेशोत्सवात पहिल्याच दिवशी 15 विद्यार्थी दाखल झाले आहेत. यावेळी शाळेत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वागत फुगे, घाटी व पुष्प देवून करण्यात आले.
      यावेळी शाळेचे श्री. सुलाखे सर, मारकड सर, अजित मुळूक सर, श्रीमती महामूनी मॅडम, वांगीकर मॅडम, काळे मॅडम, मनकटवाड मॅडम, भारती मॅडम, पाठक मॅडम, पवार सर, कांबळे सर, वडते सर, शेजाळ सर, पट्टे सर, वानखेडे मॅडम व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता .

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment