तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

मंगरूळपीर तालुक्यातील गावकरी घेत आहे जलसंधारणाचे धडे


फुलचंद भगत-
मंगरूळपीर :-दि 10 मंगरूळपीर तालुक्याची पाणी फाऊंडेशन करिता निवड झाली असून त्या अंतर्गत प्रशिक्षणास 7 फेबुवारी पासून प्रारंभ झाला आहे. हे प्रशिक्षण 20 मार्च पर्यत सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणात तालुक्यातील गावकरी जलसंधारणाचे धडे प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे घेत आहे.
      मंगरूळपीर तालुक्यातील 4 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम बार्शीटाकली तालुक्यातील मागील वर्षी स्पर्धेत तालुक्यातुन प्रथम आलेल्या  ग्राम खेर्डा खुर्द गावात सुरू आहे.
या प्रशिक्षणात गावकऱयाना सीसीटी, बांध बंदिस्ती, कटूर बांध, एलबीएस, गाबियन बंधारा,नाला खोलीकरण व जलसंधारणाचे कामे माथा ते पायथा कश्या पध्द्तीने करायचे हे प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून दर्जेदार असे प्रशिक्षण गावकरी घेत आहे सोबतच गावकऱ्याना श्रमदान व मशीनच्या सहायाने होणाऱ्या कामाचे उत्तम शिक्षण दिल्या जात आहे. प्रशिक्षण देण्यासाठी पाणी फाऊंडेशन टेक्निकल मास्टर टेनर सूरज देशमुख, तांत्रिक सहायक दीपक बकाल, वैभव कीर्तनकार, सोशल टेनर दिलीप बावनकर, वैष्णवी कुलट, पाणलोट सेवक कुष्णा गोरे, किशोर वसतकार आदी मंडळी प्रशिक्षण देत आहे. दि 9 ते 12 पर्यत होणाऱ्या पाचव्या बॅच सोबत मंगरूळपीर तालुक्यातील पिपळगाव, कुभी, अरक, माणोली, वसंतवाडी, धोत्रा, गणेशपूर, मसोला या गावचे ग्रामस्थ प्रशिक्षण घेत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment