तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

मोंढा मार्केट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल भोकरे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरातील मोंढा मार्केट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात येत
असून या पार्श्वभुमीवर आज दि.11 मार्च रोजी  जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राहुल भोकरे तर उपाध्यक्षपदी भारत गायकवाड तसेच सचिवपदी सिध्दार्थ रायभोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माजी प्राचार्य केशवराव कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संपुर्ण कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर जयंती
उत्सव समिती,मोंढा मार्केट भागातील कार्यकारिणी आज निवडण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी राहुल भोकरे , उपाध्यक्ष भारत गायकवाड, कोषाध्यक्ष रतन व्हावळे, स, सचिव सिध्दार्थ रायभोळे, सहसचिव बंटी घाडगे, संघटक विलास जाधव, सहसंघटक बबन आदोडे, सदस्य धुराजी गायकवाड, पंडित होके, गौतम गायकवाड, मंगेश कांबळे, शिवा खरे, गोरव पिंपळे, दिपक पिंपळे, दिपक पिंपळे, मनोज कुंभारे, विजय कुंभारे, बाबुलाल पिंपळे, अशोक राऊत, दत्ता खाडे, रूपेश राऊत  आदींची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment