तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

ऊपनगराध्यक्ष मा.दत्तराव कदम यांचा सिनेटवरील निवडीबद्दल सत्कार.


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील ऊपनगराध्यक्ष मा. दत्तराव कदम (काका) यांची स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या अधिसभा(सिनेट) सदस्यपदी न.प. प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. याबद्दल कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात  आज त्यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थाध्यक्ष मा.परमेश्वर कदम (ह.शि.प्र.म.) व प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांच्या हस्ते मा.दत्तराव कदम यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी गेली पंचवीस वर्षे सोनपेठच्या राजकारणात कार्यरत असणा-या या माणसाचा गौरव आम्हाला भूषणावह आहे असे मत प्राचार्य डाॅ.सातपुते यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने ऊपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील प्रा.डाॅ.अशोक जाधव व श्री चंदू पटके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथभेट दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम यांनी केले तर आभार ग्रंथपाल अनंत सरकाळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment