तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 April 2018

मंगरुळपीर येथील महावितरण कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा


फुलचंद भगत
वाशिम - महाराष्ट्र राज्य विघुत वितरण कंपनी उपविभाग मंगरुळपिर येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या आनंदात पार पडला.या वेळी ध्वजारोहण उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता श्री उमेश राठोड यांचे हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक अभियंता श्री पाटणी,डेरे,पजई उपस्थित होते.
या वेळी प्रशांत भगत यांनी कामगार चळवळी चा इतिहास सविस्तर मांडला.तसेच श्री पाटणी, दिनेश भगत,भारस्कर,पजई यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे संचालन श्री सरदार यांनी तर आभार चोपडे यांनी मानले .
कार्यक्रमाला कु रुपाली भगत,लीना इंगळे,वंदना अघम,प्रशांत भगत,दिनेश भगत,भारस्कर,नाटकर,दीघडे,दिनेश राठोड,देमापुरे,चोपडे,गोपाल पिंपळकर,राजीक,वाघ,इंगोले,राठोड,परांडे,पांडे,विनय आठवले,प्रवीण राठोड,उमेश सुर्वे,खाडे,राऊत,देशमुख,दीपक इंगोले,केदार,पांडे,बंटी फारुखी,रोहन नवघरे,दीघडे,भगत,कृष्णा कातखेडे,जाधव,पवार,चेंडूसुरे,साखरे,खोत,सरदार,बोथे,ठाकरे व बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

हिवरखेडा येथील ग्रामपंचायत मधे पाणी टंचाई आढावा बैठक

साखरा.प्रतीनीधी .शिवशंकर निरगुडे

हिवरखेडा येथील ग्रामपंचायत मधे ग्रामसभा घेण्यात आली  पाणी टंचाई आढावा बैठक जाली गावात  खूप पाणी  टंचाई जाली असून ग्रामपंचायत कडून एका वीहीरीचे आधी ग्रहण करण्यात आले आहे व गावात पाणी सुटेल असे आश्वासन सरपंच विलास हराळ व ग्रामसेवक खीस्ते साहेब यांनी ग्रामस्थाना आश्वासन दिले लवकरात लवकरच पाणी सोडले जाईल गावात सध्या मुबलक पाणी नाही लकरच गावातील वीहीरीत पाणी सोडले जाईल असे ग्रामपंचायत कडून ग्रामस्थाना आश्वासन देण्यात आले पाणी जर नाही सुटले तर गावातील महिलांनी सेनगाव तहशिल वर हंडा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा महिलांना ग्राम पंचायत ला देण्यात आला आहे

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वहिनी
साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे व्हट्स्प नं मो नं.8007689280

३ मे रोजी विधानपरिषदेचा अर्ज दाखल करण्या साठी उपस्थित राहाण्याचे आ दुर्रांनी यांचे आवाहन


परभणी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूकी साठी काँग्रेस राकाँचे उमेदवार आ बाबाजानी दुर्रानी उमेदवारी अर्ज गुरुवार दि.०३ मे २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दाखल करणार आहेत.
या दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इतर मित्र पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती तसेच सहकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे सर्वांनी अर्ज दाखल करण्या पुर्वी राष्ट्रवादी भवन, परभणी येथे सर्वजण एकत्र येऊन तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण करणार असल्याचे आ दुर्रांनी यांनी फेसबुक वरून आवाहन केले आहे

चाफेश्वर गांगवे यांना सूत्रसंचालनाचा बहुमान


जालना येथे राज्यस्तरीय कविसंमेलन, कामगार दिनानिमित्त आयोजन

रिसोड महेंद्रकुमार महाजन

शाहीर अमर,अण्णा कलामंच जालनाच्या वतीने कामगार दिनानिमित्त राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन जालना येथे करण्यात आले असून या कविसंमेलनाच्या सूत्रसंचालनाचा सन्मान रिसोड येथील ख्यातकीर्त कवी तथा निवेदक चाफेश्वर गांगवे यांना मिळाला आहे.
           जालना येथील शाहीर अमर, अण्णा कलामंच,जालनाच्या वतीने कामगार दिनाचे औचीत्य साधून जालना शहरातील टाऊन हॉल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि.1 मे 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे सूत्रसंचालन रिसोड येथील ख्यातकीर्त कवी तथा प्रसिद्ध निवेदक चाफेश्वर गांगवे हे करणार आहेत.
        या कविसंमेलनाचे उदघाटन कॉ. गणपत भिसे,परभणी यांच्या हस्ते तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे जालना यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
        या कविसंमेलनात सुरेश साबळे, ना. तु. पोघे, नंदू वानखेडे, डॉ. विशाल इंगोले, मोहन शिरसाट, डॉ. विजय काळे, हंसिनी उचीत, वामनराव पाटील, बिस्मिल्ला शेख, डॉ. प्रभाकर शेळके, सुधाकर चिंधोटे, प्रा.अशोक खेडकर, राम गायकवाड,ऍड. कैलास रत्नपारखे, विनोद जैतमल, अशोक घोडे, रेखा गतखणे, संजयकुमार सरदार, शिवाजी तेलंग, सतिशकुमार सिंग हे निमंत्रीत कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे संयोजक म्हणून कवी कैलास भाले हे राहणार असून चाफेश्वर गांगवे यांच्या निमित्ताने वाशीम जिल्ह्याला सूत्रसंचालनाचा हा बहुमान मिळाला आहे.
        चाफेश्वर गांगवे हे आपल्या सादरीकरणा च्या विशेष शैलीने संपूर्ण महाराष्ट्रभर अल्पावधीतच निवेदक म्हणून प्रसिध्द झाले असून आजपर्यंत अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले असून या सोहळ्याची निवेदक म्हणून निवड झाल्यामुळे चाफेश्वर गांगवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

लाॅयन्स कल्ब व पोलिस स्टेशनच्या वतीने गुरूवारी परतूर येथे वाहन चालकाची नेञ तपासणी


परतूर:-येथील लाॅयन्स कल्ब व पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यामाने गुरूवार दिनांक 3 मे रोजी येथील जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजुला गजानन ट्रेडर्स च्या येथे दुपारी दोन ते पाच यावेळत वाहन चालकांची नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व वाहन चालकांना या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

संस्था अध्यक्ष यांनी परस्पर ५ लाख मैदानासाठी आलेला निधी केला हडप,


  बरंजळा लोखंडे येथिल मातोश्री माध्यमिक विद्यालयातील प्रकार उघड,

  चौकशी करून संस्थाअध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी,

   प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील नेहमिच वादात असलेली साविञीबाई फुले प्रसारक मंडळ बरंजळा लोखंडे अंतर्गत मातोश्री माध्यमिक विद्यालय बरंजळा लोखंडे या शाळेला मंजुर झालेला क्रिडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट राज्य ,पुणे-१ क्रिडा विकास योजनेअंतर्गत आलेला ५ लाख रूपये निधी हा परस्पर हडम केल्याची तक्रार क्रिडा विभागाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

  प्रस्ताव सोबत १५ जुलै १०१६ रोजीचे कार्यकारी मंडळाची यादी जोडलेली आहे,ती यादी सुध्दा बनावट आहे,कारण तक्रारदार सदरच्या कालावधीमध्ये कार्यकारी मंडळात नव्हता ,तसेच सदरच्या कालावधीत संस्थेवर कसल्याही प्रकारचे कार्यकारी मंडळ अस्तीत्वात नव्हते.संस्थेचे दोन सदस्य प्रतिक व प्रतिज्ञा राऊत हे आज्ञात असतांनाही संस्था अध्यक्ष यांनी चुकीच्या माहितीआधारे प्रस्ताव दाखल केलेला आहे.

   सन २०१२ पासुन संस्थेच्या कार्यकारणी मंडळामध्ये वाद चालु असुन,त्याबाबतची प्रकरणे सन्माननीय न्यायालयात चालु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.संस्थेच्या खर्चाबाबतची हिशोबपञके सादर न करणे तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभा न घेणे व संस्थेच्या हितास बाधा निर्माण होईल असे निर्णय घेणे,या सर्व कारणांमुळे माननिय साहेब धर्मादाय आयुक्त जालना यांनी कलम ४१ बी अन्वये चौकशी करण्याचे आदेश पारीत केलेले आहे.त्या अन्वये तत्कालीन कार्यकारी मंडळाविरूध्द चौकशी प्रस्तावीत आहे.ही सर्व माहिती अध्यक्ष यांनी लपवुन ठेवलेली आहे,अशा परिस्थितीत क्रिडा विभागाकडुन सदर योजनेअंतर्गत दिले अनुदान या कारणासाठी खर्च झालेले नाहीत व त्या बाबत संस्थेच्या सभासदांना विश्वासात घेतलेले नाही,

   तरी आपल्या कार्यालयात क्रीडांगण विकास अनुदानाच्या प्रस्तावाबाबत संस्थेच्या इतर सभासदांना कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार यांनी माहे फेब्रुवारी २०१८ मध्ये माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयाकडे विस्तार माहितीच्या अंतर्गत १२ डिसेंबर २०१७ रोजी अर्ज केल्यानंतर २२ फेब्रुवारी २०१८ च्या पञाअन्वये पुरविण्यात आलेल्या माहितीअन्ववे आपल्या कार्यालयाकडुन क्रिडांगण विकासासाठी सदर संस्थेस १०१६ -१७ या वर्षासाठी ५ लाख अनुदान मंजुर करण्यात आले व त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष यांनी आदर्श सहकारी बॅंक शाखा परतुर येथिल त्यांच्या स्वत:च्या खात्यातुन सदरचे अनुदान उचलेले आहे.संस्थेचे अध्यक्ष यांनी संपुर्ण अनुदानीत रक्कम मै,२०१७ पर्यंत उचल्याचे दिसुन येते,परंतु क्रिडांगण विकास योजनेअंतर्गत कसल्याही प्रकारची मैदान करण्यात आलेले नाही.आजरोजी संबधीत शाळेसमोर काटेरी झाडेझुडपे व गाजरगवत असुन,प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे मैदान सपाटीकरण झालेले नाही.

   सदरील बाब आम्ही सर्व सभासदांनी अध्यक्षाच्या निदर्शनास आणली असता त्यांनी आम्हास याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली व मिळालेल्या अनुदान रकमेचा तपसिल देण्यास स्पष्टपणे नकार दिला.तेव्हा संस्थेचे अध्यक्ष यांनी क्रिडांगण विकास यौजनेअंतर्गत मिळालेला ५ लाख निधी परस्पर हडप करून आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे स्पष्ट होत आहे.

  तरी वरील घटनेतील रितसर चौकशी होवुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी योग्य ती कारवाही व्हावी अशी मागणी तक्रारदार सदस्य नाना हिमतराव लोखंडे यांनी क्रिडा विभाग व संबधित अधिकार्यांकडे मागणी केली आहे.

  फोटो ओळी १ : याच शाळेच्या नावावर संस्थाअध्यक्ष यांनी ५ लाख रूपये पसस्पर उचलले

        ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

तेजस्वी युवा संत प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे


संत साहित्याचे गाढे अभ्यासक व तेजस्वी युवा संत प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचा जन्म प्रभू वैद्यनाथाच्या कृपाशिर्वादाने पावन झालेल्या व संत केदारी महाराजांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेल्या परळी तालुक्यातील नंदनज या गावी १ मे १९८३ रोजी झाला.  स्वामीजींचे वडिल आदिनाथराव आणि आई चंद्रभागाबाई हे दरवर्शी पांडुरंगाच्या आषाढी, कार्तिकी वारीला जात असत.  त्याचबरोबर दररोज सायंकाळी घरची कामे आटोपून गावातील हनुमान मंदिरावर पोथी(रामायण) ऐकण्यासाठी जात असत.  त्यांच्या संगतीला दहा-बारा वर्षाचे स्वामी आवर्जून हजेरी लावायचे व पुढे बसून भावार्थ रामायण वाचायचे.  रामायणातील शूरवीरतेच्या गोष्टी ऐकून महाराजांच्या अध्यात्माचा लळा वाढला आणि याच वयात महाराजांची भेट गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्याशी झाली.  महाराजांमधील अध्यात्माची गोडी, चपळपणा, तल्लख बुद्धी, चाणाक्ष स्मरणशक्ती आणि निर्भयी वृत्ती पाहून गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांनी महाराजांना आपल्यासोबत ओंकारेश्वरला (रावेर, जळगाव) घेऊन गेले.  त्यांनी महाराजांना अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला.  महाराजांच्या मनातील विचारांना खतपाणी घालून त्यांच्यामध्ये भक्तीभाव मजबूत केला.  गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्याकडून घेतलेल्या गुरुपदेशाची कठोर साधना डॉ.गुट्टे महाराजांनी केली आणि गुरुवर्यांच्या सान्निध्यात स्वामी तल्लीन होऊन गेले.  म्हणतात ना, ”गुरुशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही.“ याचप्रमाणे महाराजांना उपदेष देणारे गुरु विश्वनाथ महाराज शास्त्री मिळाले आणि महाराजांचे जीवन कृतार्थ झाले. लहानपणापासूनच वैद्यकिय अधिकारी बनण्याच स्वप्न असलेल्या स्वामीजींनी महाविद्यालयीन शिक्षण जळगाव जिल्हयातील रावेर येथे पूर्ण केले आणी ’सीईटी’ च्या परीक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळवले.  पण महाराज वैद्यकिय तज्ञ होणार, ही गोष्ट काळाला मान्य नसावी.  कारण म्हणतात ना, ”संत निर्माण करावे लागत नाही.  संत निर्माण व्हावे लागतात.“ काही वैवक्तीक कारणास्तव महाराजांनी आपल्या वैद्यकिय तज्ञ (डॉक्टर) होण्याच्या स्वप्नाकडे इथेच पाठ फिरवली.  महाराजांना साक्षात बुद्धीची देवता, विश्वाचा दाता असलेल्या श्री गणेशाचा साक्षात्कार झाला.  महाराजांनी अध्यात्मिक क्षेत्रात गरुडझेप घेतली.  मग पुणे विद्यापीठातून संतश्रेश्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन स्त्री 'संत मुक्ताबाई’ यांच्या जीवनावर संशोधनपर अभ्यासक्रम (पी.एच.डी.) पूर्ण केली आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक अशी ओळख निर्माण केली.
           महाराजांनी श्री गणेशाच्या आशिर्वादाने आणि गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्या उपदेशाने अवघ्या वयाच्या 16 व्या वयापासून सत्संग, अनुष्ठांन, प्रवचन, श्रीमद्भागवत कथा, रामकथा, व्याख्याने, मार्गदर्शनपर शिबिरे आणि कीर्तन यांच्या माध्यमातून भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांचा त्रिवेणी संगम साधत जातीभेद, स्त्री-पुरुष समानता, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिश्ट रुढी, परंपरा यांवर प्रहार केला.  समाजात सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले.  तसेच त्यांनी आपल्या कार्यातून समता, बंधुता, एकता व मानवता यांसारख्या आधुनिक विचारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले.  महाराजांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा समाजावर चांगलाच प्रभाव पडला आणि तो आज अनुभवायलाही मिळतो. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यही पिंजून काढली.  महाराजांचा हा भक्तीमार्गाचा घेतलेला वसा इथेच थांबला नाही.  महाराजांनी इ.स. २०१५ साली ’मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा केंद्रबिंदू मानून समाजातील लोकांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतिसाठी उपक्रम राबविणे, समाजातील लोकांच्या समस्यांचे निवारण करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, वाईट चालीरीती, रुढी-परंपरांविषयी जनजागृती करणे, भक्तीभाव निर्माण करणे, सामजिक व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून ’सिद्धीविनायक मानव कल्याण मिशन’ या संस्थेची स्थापना केली.  या संस्थेच्या कार्यावर नजर टाकता समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर नावारुपाला आलेल्या ’सिद्धीविनायक मानव कल्याण मिशन’ या संस्थेचं आगळंवेगळं रुप पाहायला मिळतं.
        या आधुनिकीकरणाच्या युगात साहित्यिक क्षेत्रामध्ये स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे हे नाव वरच्या क्रमांकाचेच आहे, असे म्हणायला वावगे ठरणार नाही.  कारण महाराजांनी ’संत मुक्ताबाई’ यांच्या जीवनावर संशोधन (पी.एच.डी) करुन ’मुक्ताई जाहली प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला.  त्याचबरोबर त्यांची ’ओंकारेश्वर दर्शन’, ’शंकराचे बिल्वदल’, ’श्री गणेशस्तुती(ओवीबद्ध)’, ’यशस्वी जीवनाचा मार्ग’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत याचबरोबर दै.दिव्यमराठी, दै.लोकमत, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.गांवकरी, इ वृत्तपत्रांमधून विविध संशोधनपर विषयांवर लेख प्रकाशित होतात तसेच आकाशवाणीवरूनही प्रक्षेपण होते. महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती सांगायची झाली तर महाराजांनी 13 वेळा मौन साधना केल्या आहेत. (45 दिवसांचे 9 वेळा, 9 महिने 1 वेळा, 1 महिना 1 वेळा व 24 दिवस 1 वेळा)  याचबरोबर 3 वेळा महायज्ञाचेही आयोजन करण्यात आले होते.  याचबरोबर महाराजांचा नाशिक कुंभमेळा, उज्जैन कुंभमेळा, हरिद्वार कुंभमेळा, विश्व हिंदू परिषद, संत संमेलन, वारकरी संगीत संमेलन व आकाशवाणीवरील कार्यक्रमातही मोठया प्रमाणात सहभाग दिसून येतो.  महाराजांचे समाजसेवेतील व  साहित्यिक क्षेत्रातील योगदान आणी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन महाराजांना ’ब्रम्हीभूत नाना महाराज साखरे पुरस्कार’, ’श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार’, ’गौरव महाराष्ट्र पुरस्कार’ व ’विशेष कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  अशीअद्वितीय अनुभूती असलेल्या तेजस्वी युवा राष्ट्रसंत प. पू. स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांना वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा...!
              ✰‿✰लेखन✰‿✰
             अर्जुन तुळशीराम फड
            विद्यार्थी, प.पू स्वामी.डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज
               मो. ९९२१३८१००५
  

खासगी प्रवासी वाहनांनी जादा भाडं आकारल तर या टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

प्रतिनिधी

मुंबई:-एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येईल असा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे, पण यापेक्षा जास्त भाडं आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या *022-62426666* या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

परळीत कामगारदिनी कर्तृत्वान कामगारांचा कामगार कल्याण केंद्रातर्फे सत्कार


परळी (प्रतिनिधी): येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कर्तृत्वान कामगारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण केंद्रातर्फे विविध आस्थापनेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांचा कामगार दिनानिमित्त सत्कार होणारा आहे. १ मे  २०१८ रोजी सकाळी ९ वाजता परळी आगारातील सभागृहात सत्कार कार्यक्रम  होणार आहे.
परळी विभागातील सहा कर्तुत्वान कामगारांचा स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कामगार कल्याण केंद्र नेहमीच कामगार व कामगार कुटुंबीयांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी विविध योजना, उपक्रम व  कार्यक्रम राबविण्यात येतात.  विविध आर्थिक योजनांद्वारे कामगारांना आर्थिक मदत करण्यात येते. कामगारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यस्पर्धा, भजन स्पर्धा व विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. येत्या १ मे  रोजी राज्य परिवहन मंडळातील ज्ञानोबा आंधळे, मंदाकिनी गीते, महावितरणमधील विजयकुमार वरवटकर, गजानन ऑइल मील  मधील प्रवीण सराफ,  महापारेषण मधील शिवदास काळे तर वैद्यनाथ कारखान्यातील सुधाकर घुले यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार सोहळ्यात शहरातील कामगार व कामगार कुटुंबीयांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख  केले आहे.

सेनगावच्या पूनम वाणी ची महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला हाँकी संघात निवड

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:-हाँकी इंडीयाच्या वतीने भाेपाळ येथे हाेणा-या ज्युनियर मुलींच्या राष्ट्रीय हाँकी स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले असुन त्यामध्ये सेनगावची हाँकी पटु पुनम रामजी वाणी हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
हाँकी महाराष्ट्र तर्फे पुणे येथील बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा नगरीत झालेल्या शिबिरात पुनम वाणी हिची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली आहे.पुनम वाणी हि मुळची सेनगांवची असुन ती औरंगाबाद येथील एस.बी.काँलेज मध्ये बारावीचे शिक्षण घेत असुन तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.सेंटर फाँरवर्ड पाेझिशनवर खेळणा-या पुनम वाणी हिने शालेय हाँकी स्पर्धेत वेळाेवेळी चांगली कामगिरी केली आहे.याच कामगिरीच्या जाेरावर पुनम वाणीची ज्युनियर महिला हाँकी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. पुनम हिची महाराष्ट्र संघात निवड झाल्याने सेनगावची शान वाढल्याची भावना सेनगाव शहरातुन व्यक्त हाेत आहे.तिच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन हाेत आहे.

मंगरुळपीर,कारंजा येथे वाटर कप स्पर्धेला गती


फुलचंद भगत
वाशिम:-११५ गावांनी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत.यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे.ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी जलसंधारणाची कामे करीत आहेत.

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. श्रमदान करणाºया ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी रक्ताचे पाणी करून गावात जलसंधारणाची कामे करीत आहेत.   
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेंत गतवर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली होती. आता यंदा या स्पर्धेत कारंजासह मंगरुळपीर तालुक्याचीही निवड झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील मिळून ११५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत. यापैकी ३५ गावांचे सरपंच स्वत: श्रमदान करून गावकºयांसमोर आदर्श ठेवत आहेत. गाव दुष्काळमूक्त व्हावे म्हणून जलसंधारणाची कामे करण्यासाठी हे सरपंच प्रेरित झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हात काम करताना ग्रामस्थांना थकवा येऊ नये म्हणून पाण्याची निवाºयाची सोय त्यांनी केली आहे. वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाºया सरपंचांमध्ये  मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा, गणेशपूर येथे राजेंद्र राऊत, तपोवन येथे सुनिल येवले, पिंपळखुटा येथे चंदा सुदर्शन धोटे, वनोजा येथे दिलिप राऊत, पारवा, बोरव्हा बु. आणि लखमापूर येथे गोपाल लुंगे, मोहरी येथे संजय गावंडे, पोटी येथे प्रकाश गावंडे, पोघात, घोटा येथे नंदू गावंडे, कोठारी येथे भाऊ पवार, नागी येथे सतिष राऊत, लाठी येथे गणेश सुर्वे, शेंदुरजना मोरे येथे अशोक धामंदे, सायखेडा येथे विद्या देवमन गहुले, कोळंबी येथे फिरोज मोहनावाले, जांब येथे साहेबराव भगत, शेलगाव येथे किशोर भोयर, पिंपळगाव येथे विष्णू चव्हाण, जोगलदरी येथे शेषराव पवार, नांदगाव बंडू पवार, यांच्यासह आणखी चार गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी आहेत. कारंजा तालुक्यात सरहदपुर येथे संगिता चौकट, पिपळगाव बु येथे दादाराव बहुटे, प्रिपी मोडक येथे ललिता थोंटागे, बेलमंडळ येथे सचिन एकनार, झोडगा येथे सुवर्ण पवार, काकड शिवणी येथे संगिता चक्रनारायण, दोनद बु येथे निरंजन करडे आणि भुलोडा येथे मंदा ढोणे यांच्यासह आणखी दोन गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी झाले आहेत. 
 
ग्रामस्थांची फराळ, पाण्याची सोय
गावातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी सरंपच स्वत: श्रमदानच करीत नाहीत, तर कामे झाली पाहिजेत आणि ग्रामस्थही थकू न त्यांचा धीर खचू नये म्हणून विशेष काळजी सरपंचाकडून घेतली जात आहे. पारवा गटग्रामपंचायतचे सरपंच गोपाल लुंगे, जांबचे सरपंच साहेबराव भगत, नागीचे सरपंच सतिष राऊत हे श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी चहापानाची व्यवस्था करीत आहेत. पिंपळखुटा येथील सरपंच चंदा सुदर्शन धोटे या, तर स्वत: घरूनच श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी फराळाचे, नाश्त्याचे पदार्थ आणि चहा घेऊन सकाळीच दाखल होतात. ग्रामस्थांसोबतच चहापाणी घेऊन स्वत: श्रमदानाला सुरुवात करतात.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835