तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 April 2018

मंगरुळपीर,कारंजा येथे वाटर कप स्पर्धेला गती


फुलचंद भगत
वाशिम:-११५ गावांनी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत.यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे.ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी जलसंधारणाची कामे करीत आहेत.

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. श्रमदान करणाºया ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतानाच ही सरपंच मंडळी रक्ताचे पाणी करून गावात जलसंधारणाची कामे करीत आहेत.   
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेंत गतवर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली होती. आता यंदा या स्पर्धेत कारंजासह मंगरुळपीर तालुक्याचीही निवड झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील मिळून ११५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले असले तरी, प्रत्यक्षात ६२ गावे या स्पर्धेत सक्रियतेने श्रमदान करीत आहेत. यापैकी ३५ गावांचे सरपंच स्वत: श्रमदान करून गावकºयांसमोर आदर्श ठेवत आहेत. गाव दुष्काळमूक्त व्हावे म्हणून जलसंधारणाची कामे करण्यासाठी हे सरपंच प्रेरित झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हात काम करताना ग्रामस्थांना थकवा येऊ नये म्हणून पाण्याची निवाºयाची सोय त्यांनी केली आहे. वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणाºया सरपंचांमध्ये  मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा, गणेशपूर येथे राजेंद्र राऊत, तपोवन येथे सुनिल येवले, पिंपळखुटा येथे चंदा सुदर्शन धोटे, वनोजा येथे दिलिप राऊत, पारवा, बोरव्हा बु. आणि लखमापूर येथे गोपाल लुंगे, मोहरी येथे संजय गावंडे, पोटी येथे प्रकाश गावंडे, पोघात, घोटा येथे नंदू गावंडे, कोठारी येथे भाऊ पवार, नागी येथे सतिष राऊत, लाठी येथे गणेश सुर्वे, शेंदुरजना मोरे येथे अशोक धामंदे, सायखेडा येथे विद्या देवमन गहुले, कोळंबी येथे फिरोज मोहनावाले, जांब येथे साहेबराव भगत, शेलगाव येथे किशोर भोयर, पिंपळगाव येथे विष्णू चव्हाण, जोगलदरी येथे शेषराव पवार, नांदगाव बंडू पवार, यांच्यासह आणखी चार गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी आहेत. कारंजा तालुक्यात सरहदपुर येथे संगिता चौकट, पिपळगाव बु येथे दादाराव बहुटे, प्रिपी मोडक येथे ललिता थोंटागे, बेलमंडळ येथे सचिन एकनार, झोडगा येथे सुवर्ण पवार, काकड शिवणी येथे संगिता चक्रनारायण, दोनद बु येथे निरंजन करडे आणि भुलोडा येथे मंदा ढोणे यांच्यासह आणखी दोन गावांत सरपंच श्रमदानात सक्रीय सहभागी झाले आहेत. 
 
ग्रामस्थांची फराळ, पाण्याची सोय
गावातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी सरंपच स्वत: श्रमदानच करीत नाहीत, तर कामे झाली पाहिजेत आणि ग्रामस्थही थकू न त्यांचा धीर खचू नये म्हणून विशेष काळजी सरपंचाकडून घेतली जात आहे. पारवा गटग्रामपंचायतचे सरपंच गोपाल लुंगे, जांबचे सरपंच साहेबराव भगत, नागीचे सरपंच सतिष राऊत हे श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी चहापानाची व्यवस्था करीत आहेत. पिंपळखुटा येथील सरपंच चंदा सुदर्शन धोटे या, तर स्वत: घरूनच श्रमदान करणाºया ग्रामस्थांसाठी फराळाचे, नाश्त्याचे पदार्थ आणि चहा घेऊन सकाळीच दाखल होतात. ग्रामस्थांसोबतच चहापाणी घेऊन स्वत: श्रमदानाला सुरुवात करतात.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment