तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 April 2018

परळीत कामगारदिनी कर्तृत्वान कामगारांचा कामगार कल्याण केंद्रातर्फे सत्कार


परळी (प्रतिनिधी): येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कर्तृत्वान कामगारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण केंद्रातर्फे विविध आस्थापनेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांचा कामगार दिनानिमित्त सत्कार होणारा आहे. १ मे  २०१८ रोजी सकाळी ९ वाजता परळी आगारातील सभागृहात सत्कार कार्यक्रम  होणार आहे.
परळी विभागातील सहा कर्तुत्वान कामगारांचा स्मृतिचिन्ह,शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. कामगार कल्याण केंद्र नेहमीच कामगार व कामगार कुटुंबीयांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी विविध योजना, उपक्रम व  कार्यक्रम राबविण्यात येतात.  विविध आर्थिक योजनांद्वारे कामगारांना आर्थिक मदत करण्यात येते. कामगारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यस्पर्धा, भजन स्पर्धा व विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. येत्या १ मे  रोजी राज्य परिवहन मंडळातील ज्ञानोबा आंधळे, मंदाकिनी गीते, महावितरणमधील विजयकुमार वरवटकर, गजानन ऑइल मील  मधील प्रवीण सराफ,  महापारेषण मधील शिवदास काळे तर वैद्यनाथ कारखान्यातील सुधाकर घुले यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार सोहळ्यात शहरातील कामगार व कामगार कुटुंबीयांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख  केले आहे.

No comments:

Post a Comment