तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 April 2018

चाफेश्वर गांगवे यांना सूत्रसंचालनाचा बहुमान


जालना येथे राज्यस्तरीय कविसंमेलन, कामगार दिनानिमित्त आयोजन

रिसोड महेंद्रकुमार महाजन

शाहीर अमर,अण्णा कलामंच जालनाच्या वतीने कामगार दिनानिमित्त राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन जालना येथे करण्यात आले असून या कविसंमेलनाच्या सूत्रसंचालनाचा सन्मान रिसोड येथील ख्यातकीर्त कवी तथा निवेदक चाफेश्वर गांगवे यांना मिळाला आहे.
           जालना येथील शाहीर अमर, अण्णा कलामंच,जालनाच्या वतीने कामगार दिनाचे औचीत्य साधून जालना शहरातील टाऊन हॉल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि.1 मे 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे सूत्रसंचालन रिसोड येथील ख्यातकीर्त कवी तथा प्रसिद्ध निवेदक चाफेश्वर गांगवे हे करणार आहेत.
        या कविसंमेलनाचे उदघाटन कॉ. गणपत भिसे,परभणी यांच्या हस्ते तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे जालना यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
        या कविसंमेलनात सुरेश साबळे, ना. तु. पोघे, नंदू वानखेडे, डॉ. विशाल इंगोले, मोहन शिरसाट, डॉ. विजय काळे, हंसिनी उचीत, वामनराव पाटील, बिस्मिल्ला शेख, डॉ. प्रभाकर शेळके, सुधाकर चिंधोटे, प्रा.अशोक खेडकर, राम गायकवाड,ऍड. कैलास रत्नपारखे, विनोद जैतमल, अशोक घोडे, रेखा गतखणे, संजयकुमार सरदार, शिवाजी तेलंग, सतिशकुमार सिंग हे निमंत्रीत कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे संयोजक म्हणून कवी कैलास भाले हे राहणार असून चाफेश्वर गांगवे यांच्या निमित्ताने वाशीम जिल्ह्याला सूत्रसंचालनाचा हा बहुमान मिळाला आहे.
        चाफेश्वर गांगवे हे आपल्या सादरीकरणा च्या विशेष शैलीने संपूर्ण महाराष्ट्रभर अल्पावधीतच निवेदक म्हणून प्रसिध्द झाले असून आजपर्यंत अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले असून या सोहळ्याची निवेदक म्हणून निवड झाल्यामुळे चाफेश्वर गांगवे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

No comments:

Post a comment