तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 April 2018

तेजस्वी युवा संत प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे


संत साहित्याचे गाढे अभ्यासक व तेजस्वी युवा संत प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचा जन्म प्रभू वैद्यनाथाच्या कृपाशिर्वादाने पावन झालेल्या व संत केदारी महाराजांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेल्या परळी तालुक्यातील नंदनज या गावी १ मे १९८३ रोजी झाला.  स्वामीजींचे वडिल आदिनाथराव आणि आई चंद्रभागाबाई हे दरवर्शी पांडुरंगाच्या आषाढी, कार्तिकी वारीला जात असत.  त्याचबरोबर दररोज सायंकाळी घरची कामे आटोपून गावातील हनुमान मंदिरावर पोथी(रामायण) ऐकण्यासाठी जात असत.  त्यांच्या संगतीला दहा-बारा वर्षाचे स्वामी आवर्जून हजेरी लावायचे व पुढे बसून भावार्थ रामायण वाचायचे.  रामायणातील शूरवीरतेच्या गोष्टी ऐकून महाराजांच्या अध्यात्माचा लळा वाढला आणि याच वयात महाराजांची भेट गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्याशी झाली.  महाराजांमधील अध्यात्माची गोडी, चपळपणा, तल्लख बुद्धी, चाणाक्ष स्मरणशक्ती आणि निर्भयी वृत्ती पाहून गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांनी महाराजांना आपल्यासोबत ओंकारेश्वरला (रावेर, जळगाव) घेऊन गेले.  त्यांनी महाराजांना अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला.  महाराजांच्या मनातील विचारांना खतपाणी घालून त्यांच्यामध्ये भक्तीभाव मजबूत केला.  गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्याकडून घेतलेल्या गुरुपदेशाची कठोर साधना डॉ.गुट्टे महाराजांनी केली आणि गुरुवर्यांच्या सान्निध्यात स्वामी तल्लीन होऊन गेले.  म्हणतात ना, ”गुरुशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही.“ याचप्रमाणे महाराजांना उपदेष देणारे गुरु विश्वनाथ महाराज शास्त्री मिळाले आणि महाराजांचे जीवन कृतार्थ झाले. लहानपणापासूनच वैद्यकिय अधिकारी बनण्याच स्वप्न असलेल्या स्वामीजींनी महाविद्यालयीन शिक्षण जळगाव जिल्हयातील रावेर येथे पूर्ण केले आणी ’सीईटी’ च्या परीक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळवले.  पण महाराज वैद्यकिय तज्ञ होणार, ही गोष्ट काळाला मान्य नसावी.  कारण म्हणतात ना, ”संत निर्माण करावे लागत नाही.  संत निर्माण व्हावे लागतात.“ काही वैवक्तीक कारणास्तव महाराजांनी आपल्या वैद्यकिय तज्ञ (डॉक्टर) होण्याच्या स्वप्नाकडे इथेच पाठ फिरवली.  महाराजांना साक्षात बुद्धीची देवता, विश्वाचा दाता असलेल्या श्री गणेशाचा साक्षात्कार झाला.  महाराजांनी अध्यात्मिक क्षेत्रात गरुडझेप घेतली.  मग पुणे विद्यापीठातून संतश्रेश्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन स्त्री 'संत मुक्ताबाई’ यांच्या जीवनावर संशोधनपर अभ्यासक्रम (पी.एच.डी.) पूर्ण केली आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक अशी ओळख निर्माण केली.
           महाराजांनी श्री गणेशाच्या आशिर्वादाने आणि गुरुवर्य विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्या उपदेशाने अवघ्या वयाच्या 16 व्या वयापासून सत्संग, अनुष्ठांन, प्रवचन, श्रीमद्भागवत कथा, रामकथा, व्याख्याने, मार्गदर्शनपर शिबिरे आणि कीर्तन यांच्या माध्यमातून भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांचा त्रिवेणी संगम साधत जातीभेद, स्त्री-पुरुष समानता, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिश्ट रुढी, परंपरा यांवर प्रहार केला.  समाजात सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले.  तसेच त्यांनी आपल्या कार्यातून समता, बंधुता, एकता व मानवता यांसारख्या आधुनिक विचारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले.  महाराजांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा समाजावर चांगलाच प्रभाव पडला आणि तो आज अनुभवायलाही मिळतो. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यही पिंजून काढली.  महाराजांचा हा भक्तीमार्गाचा घेतलेला वसा इथेच थांबला नाही.  महाराजांनी इ.स. २०१५ साली ’मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा केंद्रबिंदू मानून समाजातील लोकांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतिसाठी उपक्रम राबविणे, समाजातील लोकांच्या समस्यांचे निवारण करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, वाईट चालीरीती, रुढी-परंपरांविषयी जनजागृती करणे, भक्तीभाव निर्माण करणे, सामजिक व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून ’सिद्धीविनायक मानव कल्याण मिशन’ या संस्थेची स्थापना केली.  या संस्थेच्या कार्यावर नजर टाकता समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेल्या संस्थांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर नावारुपाला आलेल्या ’सिद्धीविनायक मानव कल्याण मिशन’ या संस्थेचं आगळंवेगळं रुप पाहायला मिळतं.
        या आधुनिकीकरणाच्या युगात साहित्यिक क्षेत्रामध्ये स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे हे नाव वरच्या क्रमांकाचेच आहे, असे म्हणायला वावगे ठरणार नाही.  कारण महाराजांनी ’संत मुक्ताबाई’ यांच्या जीवनावर संशोधन (पी.एच.डी) करुन ’मुक्ताई जाहली प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला.  त्याचबरोबर त्यांची ’ओंकारेश्वर दर्शन’, ’शंकराचे बिल्वदल’, ’श्री गणेशस्तुती(ओवीबद्ध)’, ’यशस्वी जीवनाचा मार्ग’ इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत याचबरोबर दै.दिव्यमराठी, दै.लोकमत, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.गांवकरी, इ वृत्तपत्रांमधून विविध संशोधनपर विषयांवर लेख प्रकाशित होतात तसेच आकाशवाणीवरूनही प्रक्षेपण होते. महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती सांगायची झाली तर महाराजांनी 13 वेळा मौन साधना केल्या आहेत. (45 दिवसांचे 9 वेळा, 9 महिने 1 वेळा, 1 महिना 1 वेळा व 24 दिवस 1 वेळा)  याचबरोबर 3 वेळा महायज्ञाचेही आयोजन करण्यात आले होते.  याचबरोबर महाराजांचा नाशिक कुंभमेळा, उज्जैन कुंभमेळा, हरिद्वार कुंभमेळा, विश्व हिंदू परिषद, संत संमेलन, वारकरी संगीत संमेलन व आकाशवाणीवरील कार्यक्रमातही मोठया प्रमाणात सहभाग दिसून येतो.  महाराजांचे समाजसेवेतील व  साहित्यिक क्षेत्रातील योगदान आणी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन महाराजांना ’ब्रम्हीभूत नाना महाराज साखरे पुरस्कार’, ’श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार’, ’गौरव महाराष्ट्र पुरस्कार’ व ’विशेष कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  अशीअद्वितीय अनुभूती असलेल्या तेजस्वी युवा राष्ट्रसंत प. पू. स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांना वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा...!
              ✰‿✰लेखन✰‿✰
             अर्जुन तुळशीराम फड
            विद्यार्थी, प.पू स्वामी.डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज
               मो. ९९२१३८१००५
  

No comments:

Post a comment