तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 April 2018

पाथरीत कारने तीन वर्षीय बालकाला चिरडले;माता गंभीर जखमी

प्रतिनिधी

 मातेस परभणीस हलवले

पाथरी तहसील कार्यालया समोर महामार्गावरील घटना

पाथरी:-माहेर कडील कुदुंबासह आपल्या ३ वर्षीय मुलास घेऊन उभ्या असलेल्या मातेस एका कारने जोरदार धडक दिल्याने यात बालक जागीच ठार झाला तर अन्य तीन जन जखमी झाल्याची घटना गुरूवार २६ एप्रील रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातुन जाणाऱ्या २२२ महामार्गावर तहसील कार्यालया समोर घडली यातील गंभीर मातेस पुढील उपचारार्थ परभणीस हालवण्यात आले आहे. याप्रकरणी पाथरी पोलीसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    मानवत तालूक्यातील रत्नापूर येथील रामेश्वर मारकळ यांच्या पत्नी शिल्पा मारकळ यांचे माहेर पाथरी शहरातील नामदेव नगर असल्याने लग्ना निमित्य त्या पाथरीला आल्या होत्या सायंकाळी सात च्या सुमारास शिल्पा मारकळ आई लक्ष्मीबाई कड , भाऊ रतन कड व इतर हे नामदेव नगरकडे घरी जात असतांना काही कामा निमित्त पाथरी तहसील कार्यालया समोर उभे होते यावेळी अचानक परभणी कहून माजलगाव कडे भरधाव जाणाऱ्या कारने यांना जोरदार धडक दिल्याने यात ३ वर्षीय बालक समर्थ मारकळ याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा मारकळ ,लक्ष्मीबाई कड या जखमी झाल्या शिल्पा मारकळ यांना जास्तीचा मार असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ परभणी जिल्हा रुग्नालयात हालवण्यात आले आहे या प्रकरणी पाथरी पोलीसात कार चालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments:

Post a Comment