तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 May 2018

स्वप्निल फोकमारे सेट परीक्षा उत्तीर्ण

विशाल नांदोकार.
तेल्हारा:-येथील स्वप्निल फोकमारे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले  आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
     विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत  घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) जानेवारी  2018 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत वाणिज्य या विषयात  स्वप्नील फोकमारे  यांनी घवघवीत यश संपादन केले. सध्या ते तेल्हारा येथील डॉ गो खे महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल त्यांचे वडील, आई, सर्व मित्र, सर्व शिक्षक वृंद शिक्षकत्तोर कर्मचारीआदींनी अभिनंदन केले आहे.

कोल्हापूरातील अधिकाऱ्याला नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक.


दीड हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव सातपुतेला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदाशिव सातपुते याची ही अटक शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली. कारण, आज ज्ञानदेव सातपुते याचा कामावरील आज शेवटचा दिवस होता. दोन तासानंतर ते निवृत्त होणार होता. मात्र, पैशाचा मोह नडला आणि सातपुतेच्या कारकीर्दीचा शेवट कटू झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सातपुते याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीने लेखापाल सदाशिव याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी–विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एका महिलेने त्यांची जमीन विक्री करण्यासाठी विचारणा केली होती. ही जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सेटिव्ह झोन) येतेका, हे तपासून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी येथील वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते याने या कामासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशीसंपर्क साधला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक कार्यालयात सापळा लावला होता. तेव्हा सातपुते हा दीड हजाराची लाच घेताना पकडला गेला. पंचासमक्ष लाचेची रक्कम वसूल करण्यात आली.

येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता.


कोकण गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कमालीचा उकाडा जाणवत आहे. येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, मॉन्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. राज्यात सूर्य आग ओकत असून, विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. उद्या (शुक्रवार) ला गोव्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. केरळच्या आगमनानंतर कर्नाटकातील म्हैसूर कोडार्ईकँनल, तुतीकोरीन मध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अंदमान, निकोबार, कर्नाटक किनारपट्टी, कोकण-गोवा, तामिळनाडू तसेच आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भ मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी.


गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणारी वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.संजिता चानूने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदकजिंकले होते.चानूच्या शरिरात टेस्टोस्टेरोन स्टेरॉयड हे उत्तेजक द्रव्य सापडले. यामुळे शरिरात जास्त शक्ती निर्माण होते. चानू उत्तेजण चाचणीत दोषी आढळल्याने तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले. या प्रकरणात संपूर्ण चौकशी केल्यानंतर तिच्याबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने दिलीआहे.

फुलं तोडली म्हणून सुनेकडून सासूला मारहाण.


कोलकातामध्ये  घरातील फुलं तोडल्याच्या कारणामुळे सासूने सुनेला मारहाण केलीय. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण सुरु असताना पीडित महिलेचा मुलगा शांतपणे हा सर्व प्रकार पाहत होता. जशोदा पाल असं या पीडित वृद्ध महिलेचे नाव आहे. तर स्वप्ना पॉल असे तिला  मारहाण करणाऱ्या सुनेचे नाव आहे.स्वप्ना आपल्या सासूला मारहाण करत असताना शेजाऱ्याचे हा प्रकार पाहिला. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शुट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासांमध्येच हा व्हिडीओ पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. महिला पोलीस आधिकारी शुभ्रा चक्रवर्ती यांनी हा व्हिडिओ बघितला. त्यांनीही हा व्हिडीओ पाहिला आणि लगेच या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि तिला अटक केलीय.

दिल्लीच्या कुटुंबावर यवतमाळमध्ये काळाचा घाला; अपघातात 10 जणांचा मृत्यू.


नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये दर्शनासाठी जात असताना कोसदनी घाटात हा अपघात झाला.दिल्लीतील शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला आलं होतं. हे कुटुंब तीन गाड्यांमधून प्रवास करत होतं. यातील एका गाडीला कोसदनी घाटात भीषण अपघात झाला. गाडीला ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरगुती गॅस सिलिंडर महागला.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण,गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.विनाअनुदानित सिलिंडर ४८ रुपयांनी महागला आहे. तर, अनुदानित सिलिंडरच्या दरात अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.आधीच नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे. त्यातच आता सिलिंडर महागल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीन वाढ होणार असल्याचं दिसतं आहे.

दुर्गामाता ज्यु.कॉलेज सोयगावं देवी व जवाहर ज्यु. कॉलेज वाडी बु.चे बारावी परीक्षेत घवघवीत यश

भोकरदन(प्रतिनिधी):-

तालुक्यातील दुर्गामाता ज्यु. कॉलेज सोयगावं देवी व जवाहर ज्यु.कॉलेज वाडी बु.या दोन शाळांनी यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. दुर्गामाता ज्युनिअर कॉलेज चा 12 वी विज्ञान शाखेचा 98%,कला शाखेचा 100% तर वाणिज्य शाखेचा 80%निकाल लागला आहे.विज्ञान शाखेत 5 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व 43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीर्ण झाले असून कला शाखेचे 24 पैकी 24 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.तर जवाहर ज्युनिअर कॉलेजचा 12वी विज्ञान शाखेचा निकाल 100%,कला शाखेचा 92% लागला असून यामध्ये विज्ञान शाखेच्या 205 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 155 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर कला शाखेच्या 89 विद्यार्थ्यांपैकी 10 विध्यार्थी विशेष प्राविण्यासह तर50 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.सभापती श्री एल.के.दळवी,प्राचार्य बी.ई. शिंदे,प्राचार्य ए.टी.कळम,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व गांवकरी मंडळींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले.

       ╭════════════╮    ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन -------------------------------- 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी मो.नं./व्हाॅट्स अॅप :  9637599472 ...                           ╰════════════╯

भाजपासोबत यापुढे युती नाही, उद्धव ठाकरेंची घोषणा.


भाजपासोबत यापुढे कोणतीही युती नाही. यापुढील निवडणूक स्वबळाच्या ताकदीवर लढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपासहित निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग फुंडकरांना श्रद्धांजली वाहिली. भाजपाच्या पराभवाचा आनंद होतोय म्हणून पत्रकार परिषद घेण्यात आलेली नाही असंही ते यावेळी बोलले.२०१४ मध्ये पुढील २५ वर्ष हे सरकार जाणार नाही असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. मात्र पोटनिवडणुकांचे निकाल पाहता यांनी बहुमत गमावलं आहे हे स्पष्ट दिसतंय. चार वर्षात ते खाली खेचले गेले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं. भाजपाला विजयासाठी काहीही करायचं आहे का असा प्रश्न पडतो असंही ते बोलले. निवडणूक आयोगावर टीका करताना निवडणूक आयोग म्हणजे नुसतं बुजगावणं आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेबांकडून मतदानाचा मुलभूत अधिकार काढून घेण्यात आला होता अशी आठवण सांगतानाएकीकडे मतदान करण्याचं आवाहन केलं जातं आणि दुसरीकडे मशीन खराब होतात, नावं नसतात. सर्व पक्षांनी मिळून निवडणूक आयुक्तांविरोधात करप्ट सिस्टीम अंतर्गत केस केली पाहिजे असंही ते म्हणाले.
एका रात्रीत लाखभर मतं कशी वाढली ? लाखभर मतं वाढली त्याचे पुरावे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पराभव झालाय हे मानायला मी तयार नाही. हा पराभव असूच शकत नाही. जनतेच्या भावना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. पालघरमध्ये शिवसेना ऐनवेळी माघार घेईल असं अनेकांना वाटलं होतं पण तसं झालं नाही. जे शब्द आम्ही दिलेत त्यावरुन मागे हटणार नाही असं आश्वासन देताना त्यांनी शिवसैनिकांचं अभिनंदनही केलं.भाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेने प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

आता मोदींची लाट नाही , भंडारा-गोंदियातील विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया.


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी प्रतिक्रिया दिली आहे. विजयाबद्दल येथील जनतेचे आभार त्यांनी मानलेच मात्र विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार त्यांनीयावेळी मानले. तसंच २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीची लाट आता नाहीये अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी या सरकारच्या विरोधात रोष मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाला. त्यातील प्रामुख्याने कर्जमाफीन मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड चीड असल्याचे जाणवले, असं ते म्हणाले. याशिवाय पालघर निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी समविचारी पक्ष एकत्र आले असते तर तेथेही चित्र वेगळं दिसलं असतं,असं म्हटलं. नाना पटोले यांनी भाजपाच्या पक्षनेतृत्वावर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक लागली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे हे उमेदवार होते तर भाजपाने हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे कुकडे हे आघाडीवर होते. कुकडेंनी ४० हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला. महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदासंघात पोटनिवडणूक होती. भाजपाला त्यातील पालघरची एकच जागा राखता आली.

मंगरुलपीर कलंदरिया महाविद्यालय के शानदार परिणाम की परंपरा कायम.


मंगरूलपीर 31 मई.
शिक्षा बोर्ड अंतर्गत 12 वीं के नतीजे घोषणा में कलंदरिया उर्दू कनिष्ट कला व विज्ञान महाविद्यालय ने शानदार परिणाम की परंपरा को बरकरार रखा है . इस वर्ष महाविद्यालय की विज्ञान शाखा का 95.23 प्रतिशत परिणाम रहा है जबकि कला शाखा का 71.09 प्रतिशत परिणाम रहा है. 12वीं कक्षा की विज्ञान शाखा से कु. नजमुस्सहर अब्दुल साबिर को 80.46 प्रतिशत अंक प्राप्त हुए हैं . मोहम्मद साद मोहमंद जाकीर को 79.23 प्रतिशत अंक प्राप्त हुए है और सानिया फिरदोस मोहम्मद वासिक को 78.61प्रतिशत अंक प्राप्त हुए हैं. ठीक इसी प्रकार 12 वीं कक्षा की कला शाखा से सालेहा खानम डॉ. फिरोज खान को 82.92 प्रतिशत अंक ,  निदा फिरदौस मोहम्मद अनीस को 74.61 प्रतिशत अंक और यसिरा फातिमा अब्दुल हलीम को 71.38 प्रतिशत अंक प्राप्त हुए है. छात्रों की इस नुमायां कामयाबी पर संस्था अध्यक्ष अल्हाज अब्दुल कुद्दूस तथा प्राचार्य मोहम्मद जावेद इकबाल ने कला और विज्ञान शाखा से संबंधित अध्यापकों के मार्गदर्शन की सराहना करते हुए सफल छात्रों को उज्वल भविष्य के लिए शुभकामाएं दी. तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयों इस अवसर पर प्रधानाध्यापक जावेद इकबाल और सफल छात्रों को बधाई दी.                          फुलचंद भगत,मंगरुलपीर/वाशिम मो.9763007835

अधिकमास निमित्त धर्म प्रचार दौरा संपन्न

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्याच्या वतीने अधिक मासा निमित्त दिनांक 27 में रोजी दुपारी 3 वाजता महादेव मंदीर पासुन जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ (वाराणशी) उत्तरप्रदेश यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. दिनांक 28 में रोजी महापुजा नंतर गजानद मंगल कार्याल्यात असंख्य भाविक भक्ततानी दर्शन घेतले यावेळी श्री गुरू डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णा हे व्यासपिठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ हे होते. यावेळी जगत गुरू चंद्रशेखर शिवाचार्य यांनी सर्व समाजाना मार्गदर्शन केले यावेळी शहरात भव्य रॉलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठया संख्यात माहिला व पुरूष सहभागी होते. यावेळी मा.सरपंच लक्ष्मतराव रोकडे, शिवाजी वाडेवाले, रामेश्वर स्वामी, सुर्यकांत पळसकर, रमेश लांडगे माजी सैनिक होळगे आप्पा, नागनाथ खेडकर यासह आदि पदधिकारी उपस्थित होते.

मंगरुलपीर कलंदरिया महाविद्यालय के शानदार परिणाम की परंपरा कायम.


मंगरूलपीर 31 मई.
शिक्षा बोर्ड अंतर्गत 12 वीं के नतीजे घोषणा में कलंदरिया उर्दू कनिष्ट कला व विज्ञान महाविद्यालय ने शानदार परिणाम की परंपरा को बरकरार रखा है . इस वर्ष महाविद्यालय की विज्ञान शाखा का 95.23 प्रतिशत परिणाम रहा है जबकि कला शाखा का 71.09 प्रतिशत परिणाम रहा है. 12वीं कक्षा की विज्ञान शाखा से कु. नजमुस्सहर अब्दुल साबिर को 80.46 प्रतिशत अंक प्राप्त हुए हैं . मोहम्मद साद मोहमंद जाकीर को 79.23 प्रतिशत अंक प्राप्त हुए है और सानिया फिरदोस मोहम्मद वासिक को 78.61प्रतिशत अंक प्राप्त हुए हैं. ठीक इसी प्रकार 12 वीं कक्षा की कला शाखा से सालेहा खानम डॉ. फिरोज खान को 82.92 प्रतिशत अंक ,  निदा फिरदौस मोहम्मद अनीस को 74.61 प्रतिशत अंक और यसिरा फातिमा अब्दुल हलीम को 71.38 प्रतिशत अंक प्राप्त हुए है. छात्रों की इस नुमायां कामयाबी पर संस्था अध्यक्ष अल्हाज अब्दुल कुद्दूस तथा प्राचार्य मोहम्मद जावेद इकबाल ने कला और विज्ञान शाखा से संबंधित अध्यापकों के मार्गदर्शन की सराहना करते हुए सफल छात्रों को उज्वल भविष्य के लिए शुभकामाएं दी. तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयों इस अवसर पर प्रधानाध्यापक जावेद इकबाल और सफल छात्रों को बधाई दी.                          फुलचंद भगत,मंगरुलपीर/वाशिम मो.9763007835

परतूर येथे मराठा क्रांती भवन ऊभारणी करीता २५लाख रू. चा निधी सुपुर्द.


    प्रतिनिधी :
परतूर :-येथे मराठा क्रांती भवन ऊभारणी करिता परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. संजय जाधव यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आज २५ लाख रू. चा निधी सुपूर्द केला.
    यावेळी अशोक तनपुरे, श्याम बरकुले , प्रा. संभाजी तिडके , प्रा. पांडूरंग नवल , गणेश नळगे ,  राजेश भुजबळ, संदीप जगताप, भिसे सर, प्रभाकर नळगे , प्रशांत बेरगुडे , विकास खरात उत्तम पवार , माऊली सोळंके , अशोकराव बरकुले, विक्रम राजे तौर, सुरेश गवळी आदिंसह कार्यकर्ते ऊपस्थित होते.
खासदार जाधव यांनी निधी दिल्याबद्दल परतूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वरिल सर्वांनी विशेष आभार व्यक्त केले.


श्रीनिवास वनगांसाठी आमचे दरवाजे कायम खुले – देवेंद्र फडणवीस


श्रीनिवास वनगांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ज्याप्रकारे निवडणूक झाली ते क्लेषदायी होतं असंही म्हटलं. मित्रपक्षाने आमच्याच नेताच्या मुलाला आमच्याविरोधात उभं केलं. यामुळे आमच्यात थोडा कडवटपणा निर्माण झाला होता. भविष्यात असं होऊ नये यासाठी प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं. ईव्हीएम मध्ये झालेल्या बिघाडाची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. आमचा सुशिक्षत मतदार सकाळी पहिल्यांदा मतदानासाठी जातो. पण ईव्हीएम बंद असल्यावर परतलेला तो पुन्हा येत नाही त्यामुळे आमचं नुकसान होतं असं त्यांनी सांगितलं. ईव्हीएम बिघाडाचा भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काही जण आम्हीच ईव्हीएमची निर्मिती केल्याप्रमाणे टीका करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असं त्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मध्ये झालेल्या पराभवाच्या कारणांवर आम्ही चर्चा करु. २०१९ मध्ये या जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.युतीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. आम्ही चर्चेसाठी कधीच नकार दिलेला नाही, चर्चेसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एकत्र लढणं आमच्या दोन्ही पक्षांच्या हिताचं आहे. समविचारी पक्ष एकमेकांविरोधात लढल्यानंतर नुकसान हे होणारच. त्यामुळे एकत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलं. शिवसेना दुसऱ्या कोणत्या पक्षासोबत जाईल असं वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

पालम तालुक्यातील गारपिट ग्रस्त शेतकरयांना आर्थीक मदत दया..वसंतराव सिरस्कर

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यात मागील दोन महिण्यापुर्वी संपुर्ण तालुक्यात गारपिट झाल्यामुळे रब्बी पिकासह बागायती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी गारपिटमुळे किती पिके बाधीत झाले याचा अहवाल तलाठयास देण्यास सांगीतला. तसा अहवाल तलाठयाने सादर केला होता. परंतु रब्बी पिकाचे नुकसान कमी दाखवा म्हणुन जिल्हाधिकारी यांनी तलाठयास तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे बहुतांशी गावातील तलाठयाने नुकसानच झाले नाही असा अहवाल सादर केला. त्यांच्या चुकीच्या अहवालामुळे पालम तालुक्यातील गारपिट ग्रस्त शेतकरयावर मोठा अन्याय झाला आहे.  तालुक्यातील गारपिट ग्रस्त शेतकरयांना आर्थीक मदत करावी अन्यथा पालम राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टींच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पालम राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार यांना देन्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ता. अध्यक्ष वसंतराव सिरस्कर (काका), उपसभापती कृ उ बा स. रत्नाकराव शिंदे, सदस्य पं.स. सोपान कुरे, कादरभाई गुळखंडकर, शंकरराव वाघमारे, सदानंद हत्तीअंबीरे, बंशीधर रोकडे, गंगाधर सिरस्कर, राजु स्वामी, आशोक पवार, सुरेश लोखंडे, साबळे मामा, रुस्तुम पौळ अदिंच्या स्वाक्षरया आहे.

शिवसेनेने साथ सोडली तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार


शिवसेनेने साथ सोडली तर आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरुवात केली आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्या असं काही घडलंच तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही 2014 पेक्षा वेगळी असेल, हे शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याचे अजितदादांनी सांगितले. शिवसेनेने सरकाराचा पाठिंबा काढल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. त्याचा निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल. मात्र, दुसरीकडे भाजपाची धोरणे ठरवणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा हे जाहीरपणे शिवसेनेशी युती करावीच लागेल, असे जाहीरपणे सांगतात. यावरून एक स्पष्ट होते की, शिवसेनेची साथ सोडल्यास आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची स्षष्ट जाणीव या नेत्यांना झाली आहे. त्यामुळे भविष्यात वेळ पडल्यास हे भाजपा नमते घेईल आणि शिवसेनेला जास्त जागा देईल, अशी शक्यताही यावेळी अजित पवार यांनी वर्तविली.