तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

छावा मराठा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी ताडकळस/प्रतिनिधी दि. 14 मे, माखणी (ता. पुर्णा) येथे छावा मराठा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 361 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी छावा मराठा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, गंगाखेड शुगर चे संचालक अच्युतराव पाटील आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोश करत छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभाजीराजे की जय, हर हर महादेव’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत आवरगंड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन आवरगंड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास भागवत आवरगंड, पुंडलिक आवरगंड, पत्रकार गोविंद मठपती आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदाशीव काळे, सतीश आवरगंड, विष्णु आवरगंड, रामा आवरगंड, सतिश पौळ, करण काळे आदीनी पुढाकार घेतला.

प्रतिनिधी
ताडकळस:माखणी (ता.  पुर्णा) येथे छावा मराठा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 361 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी छावा मराठा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव आवरगंड, गंगाखेड शुगर चे संचालक अच्युतराव पाटील आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोश करत छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभाजीराजे की जय, हर हर महादेव’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत आवरगंड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन आवरगंड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास भागवत आवरगंड, पुंडलिक आवरगंड, पत्रकार गोविंद मठपती आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदाशीव काळे, सतीश आवरगंड, विष्णु आवरगंड, रामा आवरगंड, सतिश पौळ, करण काळे आदीनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment