तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 May 2018

मादळमोहीत मंगल कार्यालयाची भिंत कोसळली; 2 ठार; 2 जखमी

सुभाष मुळे...
--------------
गेवराई, दि. १२ __ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मंगल कार्यालयाची भिंत पडून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडातील बाप व लेकीचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
     गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मुरलीधर रोमण यांच्या मुलीचा शनिवारी राञी मादळमोही येथील युवराज मंगल कार्यालयात विवाह होता. या विवाहासाठी वऱ्हाडी मंडळी आली होती. दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यामध्ये युवराज मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. भिंती खाले दबून सुखदेव लिंबाजी चव्हाण (वय ६५ रा. चव्हाणवाडी ता. बीड ) व कालिंदा नारायण गायकवाड ( रा. ढाकलगाव ता. अंबड ) या बाप व मुलीचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
     भिंत कोसळल्याने युवराज मंगल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment