तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

कृषी, मंडळ अधिकारयांविरोधात युवतीचा एल्गार पालम : जलसंधारण, कोरडवाहु कामांचे प्रकरण : चौकशीसाठी 21 में रोजी उपोषणाचा इशारा

अरुणा शर्मा

पालम :- कृषी विभागांमार्फत जलसंधारणाची कामे किती झाली आहेत. याची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या एका युवतीस कृषी व मंडळ अधिकारयांनी अर्वाच्च भाषा वापरल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सदरील कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी 21 में रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
  पालम येथील मधु श्रावण पवार या युवतीने जलसंधारण विभागांतर्गत कृषी योजनेतून झालेल्या कामाच्या माहितीसाठी 12 एप्रिल रोजी कृषी अधिकारी अंबुलगेकर व मंडळ अधिकारी वाघमोडे यांना विचारणा करत अर्ज दिला. पण त्यांनी कोणतीही माहिती न देता उलट तिला अपशब्दाची भडीमार करत अपमान केला. या अधिकारयांनी जलसंधारण, कोरडवाहु अशा अनेक योजनांच्या कामात संगनमत करुन भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी अधिकारयांना वरिष्ठांचा आशीर्वाद मिळत असल्याने पालम तालुक्यात योजनांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. या कार्यालया विरोधात अनेकदा शेतकरयांनी उपोषण, खुर्चीला हार घालणे आदी आंदोलने केली. पण संबधित अधिकारयांवर कुठलाही चाप वरिष्ठांकडून अद्यापपर्यंत बसला नाही. यामुळे या भ्रष्टाचारात साखळी असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे. एखादी महिला विचारणा करण्यास गेल्यास तिला अपमानीत केल्या जाते.
अशा बेजबाबदार अधिकारयांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 में रोजी उपोषण करण्याचा निर्धार मधु पवार यांनी केला आहे. यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एका समितीची नेमणूक करुन सदरील कामांची योग्य ती सखोल चौकशी करावी. अशी मागणीही केली आहे.
  पालम तालुक्यात जलसंधारण विभागांतर्गत कृषी कार्यालयाकडून कामे करण्यात आली आहेत. या कामांसाठी जवळपास 6 कोटींच्या वर निधी मिळालेला आहे. पण या निधीतून कामे कुठे झाली हे समजणे कठीण बनले आहे. या कामांच्या चौकशी मागणीची विचारणा केल्यास अधिकारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. योग्य न्याय नाही मिळाला तर आंदोलन तिव्र करणार आहे. असे मधु पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment