तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 18 May 2018

कृषी, मंडळ अधिकाऱ्याच्या विरोधात युवतीचा एल्गार पालम जलसंधारण, कोरडवाहु कामांच्या प्रकरणाची चौकशी साठी 21 में रोजी उपोषणाचा इशारा

पालम- कृषी विभागां मार्फत जलसंधारणाची कामे किती झाली आहेत. याची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या एका युवतीस कृषी व मंडळ अधिकाऱ्यानी अर्वाच्च भाषा वापरल्याची तक्रार आहे. या प्रकरणी सदरील कामांची चौकशी करण्याच्या मागणी साठी 21 में रोजी जिल्हाधिकारी कार्यालया परभणी समोर उपोषण करण्याचा इशारा  निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
  पालम येथील मधु श्रावण पवार या युवतीने जलसंधारण विभागांतर्गत कृषी योजनेतून झालेल्या कामाच्या माहितीसाठी 12 एप्रिल रोजी कृषी अधिकारी अंबुलगेकर व मंडळ अधिकारी वाघमोडे यांना विचारणा करत अर्ज दिला. पण त्यांनी कोणतीही माहिती न देता उलट तिला अपशब्दाची भडीमार करत अपमान केला. या अधिकाऱ्यानी जलसंधारण, कोरडवाहु अशा अनेक योजनांच्या कामात संगनमत करुन भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्याना वरिष्ठांचा आशीर्वाद मिळत असल्याने पालम तालुक्यात योजनांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. या कार्यालया विरोधात अनेकदा शेतकऱ्यानी उपोषणे, खुर्चीला हार घालणे आदी आंदोलने केली. पण संबधित अधिकाऱ्यावर कुठलाही चाप वरिष्ठांकडून अद्याप पर्यंत बसला नाही. यामुळे या भ्रष्टाचारात साखळी असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे. एखादया महिलाने विचारणा करण्यास गेल्यास तिला अपमानीत केल्या जाते.
अशा बेजबाबदार अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 में रोजी उपोषण करण्याचा निर्धार मधु पवार यांनी केला आहे. या पूर्वीच जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एका समितीची नेमणूक करुन सदरील कामांची योग्य ती सखोल चौकशी करावी. अशी मागणीही केली आहे.
  पालम तालुक्यात जल संधारण विभागांतर्गत कृषी कार्यालयाकडून कामे करण्यात आली आहेत. या कामांसाठी जवळपास 6 कोटींच्या वर निधी मिळालेला आहे. पण या निधीतून कामे कुठे झाली हे समजणे कठीण बनले आहे. या कामांच्या चौकशी मागणीची विचारणा केल्यास अधिकारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. योग्य न्याय नाही मिळाला तर आंदोलन तिव्र करणार आहे. असे मधु पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले. तसेच कृषी अधिकारी आबुलगेकर यांना आमच्या प्रतिनिधीनी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यानी बोलताना म्हानाले कि मि मिटिंग मध्ये आहे.

No comments:

Post a Comment