तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

कोणत्याही एका पक्षाला पुन्हा सत्तेवर न आणण्याची कर्नाटकची गेल्या 35 वर्षांपासूनची परंपरा


म्हैसूर प्रांत असे कर्नाटकचे नाव होते , स्वातंत्र्यापासून तिथे काँग्रेसचेच सरकार असायचे पण आणीबाणी नंतर जनता पार्टी प्रबळ झाली आणि रामकृष्ण हेगडे हे खमके नेतृत्व कर्नाटकला भेटले हेगडे राष्ट्रीय पातळीवर कायम चर्चेत असलेले त्याकाळातील नाव होते . 1983 च्या जनता पक्षाला 95 जागा मिळाल्या होत्या व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रथम सरकार स्थापन केले होते , मला वाटते , अथवा आठवते तसे नंतर राष्ट्रपती राजवट तिथे लागू झाली होती . त्यानंतरची सरकारे आपण पाहूयात .

■ 1985 : जनता पक्ष : 139
काँग्रेसची हार

■ 1989 : काँग्रेस : 178
जनता पक्ष हार

■ 1994 : जनता दल : 115
काँग्रेस हार , केंद्रात काँग्रेस

■ 1999 : काँग्रेस : 132
जनता दल : हार , केंद्रात बीजेपी

■ 2006 : भाजप : 79 , काँग्रेस : 65
काँग्रेस जेडीएस सत्ता सरकार
नंतर
JDS +भाजपा सरकार

■ 2008 : भाजपा : 110  सत्ता सरकार / येड्डी
काँग्रेस : 80

■ 2013 : काँग्रेस : 122 + 2 = 224 सिद्धरामय्या
भाजपा : 44 , जेडीएस : 38

■ 2018 : जेडीएस + काँग्रेस सरकार ? 38 + 78
भाजपा : 104

------------------------------------------------------------------

आज भगव्याकरणाने पछाडलेल्या भाजपाला सगळेकडे भगवा हवा आहे , त्यांना काँग्रेस मुक्त देश हि करायचे आहे , त्यांना विरोधक हि नको आहे , कुठल्या पद्धतीची लोकशाही त्यांना हवी आहे प्रभू राम जाणे कारण किरकोळ विरोधाला हि ते गद्दार , देशद्रोही म्हणत आहेत .

दक्षिणेतील खास करून अपवाद वगळता कर्नाटक व तामिळनाडू या प्रदेशांची हि खासियत आहे कि त्यांनी नेहमीच आपली प्रादेशिक अस्मिता जपलेली आहे , त्यामुळे कुठल्याही निवडणुकीत गेल्या 35 वर्षापासून ते सतत सरकार बदलत आलेले आहेत . तामिळनाडू मध्येही द्रमुक आणि अण्णा द्रमुक असा आलटून पालटून सत्तेचा खेळ सुरु असतो . आंध्रप्रदेश हि त्याला अपवाद नव्हता , केरळ हि तसेच , तिकडे भाजपाला शिरकाव करता येत नाही .

या पार्श्वभूमीवर व राहुल गांधी च्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत त्यांच्यावर अपयशाचे जे खापर फोडले जात आहे , ते कसे अयोग्य आहे हे मी इथे दर्शवित आहे .

पहिली गोष्ट तर केंद्रात भाजपा सत्तेत असल्याने अमित शहा , प्रकाश जावडेकर , आदित्य योगी सहित अन्य रथी महारथी या निवडणुकीत कर्नाटक सर करण्याच्या इर्षेनेच मैदानात उतरले होते . जेल ची हवा खाऊन आलेले माजी मुख्यमंत्री येड्डी यांना त्यांनी स्वच्छ धुवून क्लीन चिट देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले , त्यांचे खास साथीदार खाण सम्राट व हजारो कोटीच्या गैर व्यवहारात अडकलेले व कोटींची काळी माया असलेले बाहुबळी रेड्डी ब्रदर्स यांनाही भाजपाने स्वच्छ धुवून क्लीन चिट देऊन निवडणूक रिंगणात उतरवले . आपले भाषण छंदी पंतप्रधान मोदीनीही नेहरू , इंदिरा , जिना असे हयात नसलेल्या व्यक्तींनी काय केले असे आरोप करत तुफान घोषणाबाजी करत भाषणबाजी केली ,

पण आज कर्नाटकचा निकाल जाहीर झाला आहे . काँग्रेस सरकार घालवायचा इर्षेने भाजपाने सगळे फंडे वापरले तरीही सत्तेपासून ते दहा हात दूरच राहिले , 104 हा अपुऱ्या आकड्यावर त्यांची गाडी अडकली , पुढे हि जाईना व कुणाचे समर्थन हि घेता येईना . अन्य पक्षाचे लोक फोडणे व सत्तेत येणे हा एकमेव पर्याय त्यांना उरला आहे .

80 वर्ष वयोमान हे खरे तर निवृत्तीचे आयुष्य जगण्याचे वय पण हव्यास पहा , गुजरात चे एकेकाळचे भाजपाचे नेते , मोदींचे जवळचे सहकारी जे आज कर्नाटक चे राज्यपाल आहेत , या वयात ते काय योग्य निर्णय घेऊ शकणार आहेत पण काँग्रेस जेएसडी च्या निवडणूक पश्चात गठबंधनाला ते उशीर करत आहेत . त्याचवेळी भाजपकडे आता येण्यासारखे कुणीही नसताना त्यांना घोडे बाजार करण्यासाठी वेळ देत आहेत . लोकशाहीची घोर विटंबना चालली आहे .

यात राहुल गांधींना अपयशी म्हणून टारगेट केले जात आहे पण काँग्रेस ची या निवडणुकीतील कामगिरी हि भाजपा पेक्षा सरस आहे . अँटी इन्कबन्सी चा पक्षाला फटका बसला नाहीतर काँग्रेस हि 38% एवढी मते घेऊन भाजपापेक्षा जास्त मते घेतलेली आहेत . भाजपा पेक्षा 6 लाख मते काँग्रेसला जास्त पडलेली आहेत . एवढे करून हि भाजपा सत्तेपासून दूरच राहत आहे .

आज , आताच्या क्षणाला काँग्रेस आणि जेडीएस युती सकृतदर्शनी झालेली आहे पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही .

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा काहीही करू शकते आणि त्यांची तशी खलबते सुरु आहेत .

No comments:

Post a Comment