तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

उद्या 4 वाजता होणार बहुमत चाचणी.


उद्या संध्याकाळी 4 वाजता कर्नाटक विधानसभेत बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या वकिलांकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. तर आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं उद्या 4 वाजता बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपाला बहुमत टिकवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment