तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

भाजपानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी 8 दिवसांची मागीतली मुदत .


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं आहे. विजयी आणि आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता भाजपा कर्नाटक मधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांना बहुमतासाठी 8 ते 10 जागा कमी पडताना दिसत आहेत. काँग्रेसनं नेमकाया स्थितीचा फायदा घेत जेडीएसला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनंहे पाऊल उचललं आहे. काँग्रेसच्या या हालचाली पाहून भाजपानंही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस-जेडीएसचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही भाजपाने केला आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठाच्या हालचालीला वेग आला आहे.  भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळावं, यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे.

No comments:

Post a Comment