तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 14 May 2018

नृसिंहवाडीच्या दिव्यांग साहित्य संमेलनात राजेंद्र लाड यांच्या "श्रमदान" कवितेस प्रचंड प्रतिसाद


   मुंबई:-प्रतिष्ठा फौंडेशन,महाराष्ट्र मु.पो. चिंचणी,ता.तासगाव,जि.सांगली आयोजित पहिले दिव्यांग साहित्य संमेलन 2018 श्रीक्षेत्र नृसिंहवाडी,ता.शिरोळ,जि.कोल्हापूर येथील प.पू.समर्थ सद्गुरु श्री महादबा पाटील महाराज ( धुळगावकर ) ट्रस्ट येथे दिनांक 13 मे 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले.
     पहिल्या सत्रातील उद्घाटनाच्या कार्यक्रमात विशेष बाब म्हणून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा सचिव तथा कवी राजेंद्र लाड यांना संधी
देण्यात येवून त्यांनी शिघ्र तयार केलेली " माझी माणसं " ही कविता सादर केली.या कवितेस उपस्थित शिरोळ तालुक्यातील रसिक प्रेमींनी व राज्यभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांनी भरभरून दाद दिली.तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीक्षेत्र पुरस्कार 2018 चे वितरण करण्यात आले.
     दुसऱ्या सत्रात कथाकार रमेश जावीर यांनी आपली कथा सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिसऱ्या सत्रात कविसंमेलन विजय आव्हाड साहित्यिक मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येवून निमंत्रीत कवी म्हणून राज्यामधून राजेंद्र लाड यांना निमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र लाड यांनी    " श्रमदान " ही कविता सादर केली.कामात काम श्रेष्ठ काम,माणुसकी त्याचे नाम,पाण्यासाठी करु श्रमदान,पाण्यासाठी आजपण,उद्यापण,करु श्रमदान सर्वजण... या ओळीने सुरुवात होणाऱ्या कवितेस उपस्थित राज्यभरातून आलेल्या कविंनी,प्रमुख मान्यवरांनी व राज्यभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांनी विशेष दखल घेत प्रचंड प्रतिसाद देवून भविष्यकाळातील पाण्याचे महत्त्व लक्षात घेवून कौतुकाची थाप तर दिलीच पण विशेष सन्मानही केला.यावेळी राज्यभरातून आलेल्या अंध व अपंग कवींनी आपल्या कविता सादर करुन कवीसंमेलनास रंगत आणली.
      यावेळी दिव्यांग साहित्य संमेलनास संमेलनाध्यक्ष जेष्ठ अंध साहित्यिक चंद्रकांत देशमुखे,प्रमुख पाहुणे आँल इंडिया सुतगिरणी फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर,श्री चिमाजीसाहेब जगदाळे फौंडेशनचे चेअरमन धनाजीराव जगदाळे,स्वागताध्यक्षा तथा जयसिंगपूर च्या नगराध्यक्षा डाँ.सौ.निता माने,श्रीक्षेत्र पुरस्कार विजेते प्रा.महेश थोरवे पाटील,प्राचार्य डाँ.सुनिल चव्हाण,शिवाजी लाला पुजारी,अमित खतरी,शितल पाटील धडेल,राजश्री साकळे,सरिता भवरे,दत्ता होगले,डाँ.उमेश दत्त कळेकर तसेच दिव्यांगांच्या अनेक बहुउद्देशिय संस्थाचे अध्यक्ष उपस्थित होते.
   पहिले दिव्यांग साहित्य संमेलन 2018 यशस्वी करण्यासाठी निमंत्रक तथा संस्थापक अध्यक्ष प्रतिष्ठा फौंडेशन तानाजीराजे जाधव,द पाँवर आँफ मिडीया चे संस्थापक सदस्य ईश्वर हुलवान,प्रा.उदय माने,प्रा.तानाजी ठोंबरे,अभय वाळकुंजे यांनी कठोर परिश्रम घेतले.संमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन राजेंद्र लाड यांनी केले तर आभार तानाजीराजे जाधव यांनी मानले. या दिव्यांग साहित्य संमेलनास राज्यभरातून शेकडो दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

No comments:

Post a Comment