तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

वीजनिर्मिती करणारी मालवण पहिली पंचायत समिती.


मालवण पंचायत समितीने सेस फंडातून सौर ऊर्जेचा प्रकल्प साकारला आहे. यातून दरदिवशी सुमारे २० किलोवॅट विजेची निर्मितीहोत असून ही वीज महावितरणला वितरित करण्यात येत आहे. यामुळे पंचायत समिती कार्यालयाला लागणार्या विजेसह विजबिलाचीही बचत होणार आहे. सौरऊर्जेतून वीज निर्मिती करणारी येथील पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे. याबरोबर तालुक्यातील आडवली ग्रामपंचायतीतही लवकरच हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पराडकर म्हणाले, महावितरणच्या २५ जानेवारी २०१६ च्या परिपत्रकानुसार नेट मिटरींग फॉर रूफ टॉप सोलर फोटो व्हल्टॅनिक सिस्टीमद्वारे पंचायत समितीच्या इमारतीवर सौर पॅनेलद्वारे सौरऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या पॅनेलद्वारे निर्माण होणारी वीज ही महावितरणला वितरित करण्यात येत आहे. पंचायत समितीला प्रत्येक दिवशी सरासरी ३० किलोवॅट वीज लागते. त्यामुळे या सौर पॅनेलच्या साह्याने प्रत्येक दिवशी २० किलोवॅट सौरऊर्जा तयार होत आहे. पंचायत समितीचे महिन्याला सुमारे दहा ते बारा हजार रुपये बिल येत होते. मात्र या सौरऊर्जेच्या प्रकल्पामुळे पंचायत समितीच्या वीज बिलात ७० टक्के बचत झाली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र इर्न्व्हटर, सोलर पॉवर मीटर बसविण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून दिवसाला २०किलोवॅट विजेची निर्मिती होत आहे.

No comments:

Post a Comment