तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 15 May 2018

संभाजीनगर दंगलीचा ‘मास्टरमाईंड’ फिरोज खान अखेर शरण.


संभाजीनगर येथे झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीचा ‘मास्टरमाईंड’ फिरोज खान अखेर पोलिसांना शरण आला आहे. फिरोज हा एमआयएमचा नगरसेवक असून महापालिकेचा विरोधी पक्षनेता आहे. दंगलीचा खरा सूत्रधार फिरोज खानच असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते, मात्र फिरोज पळून गेला असल्याने त्यांना हात हलवत परत यावे लागले होते.मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील त्याला घेऊन पोलीस स्थानकात आले.  सोमवारी पत्रकार परिषदेत याचा जलिल यांनी दंगेखोर फिरोजचे तोंड फाटोस्तर कौतुक केले होते, परंतु आज त्याला पोलीस स्थानकात घेऊन येण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. पोलिसांनी फिरोजला बेड्या ठोकल्या आहेत.शुक्रवारी संभाजीनगर मध्ये धर्मांधांनी दंगल घडवून आणली. यामध्ये दोन जण ठार तर ३० ते ४० जण जखमी झाले होते. दंगलीत एकूण दीडशे ते पावणेदोनशे वाहने व दुकाने जळून खाक झालीअसून यात एकूण दहा कोटींचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून दंगलीतील आरोपींना ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment