तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 May 2018

बोंडअळी च्या नुकसान भरपाईचे श्रेय कसले घेता ; एका टप्यात मदत द्या-मुंडे

नवनवीन निकष लावून शेतक-यांची थट्टा काय करता - धनंजय मुंडे यांचा सवाल

37 हजार 500 रु जाहीर केले होते त्याचे काय झाले ?

बीड दि 12 ----- गुलाबी बोंड अळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आधीच शेतक-यांची चेष्टा केली आहे. आता ही मदत आमच्यामुळेच मिळाली असे दाखवून त्याचे श्रेय घेऊन बेगडी प्रेम दाखवण्याची मंत्र्यामध्ये स्पर्धा लागली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची खरोखरच भावना असेल तर मदतीचे नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा करण्यापेक्षा एकाच टप्प्यात पूर्ण मदत द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

         मागील वर्षी आलेल्या बोंड अळीच्या संकटामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे या शेतकऱ्यांना एकरी 50000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांनी व आम्ही विरोधी पक्षांनी सतत मागणी केल्यानंतर , त्यासाठी संघर्ष केल्यानंतर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली.

ही मदत जाहीर करण्यात आली करण्यासही सहा महिने विलंब केला आणि मदत जाहीर केल्यानंतर ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही मदतीबाबत नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे . आता जाहीर केलेल्या मदतीमध्ये तीन टप्प्यांमध्ये हिमदत देण्यात येणार  असून पहिल्या टप्प्याचे पूर्ण वितरण झाल्यानंतर दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.  या प्रक्रियेस किती वेळ लागेल हे सांगता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे असे असताना जाहीर झालेली मदत आपल्यामुळेच मिळाली असा आव आणीत जिल्ह्यातील काही मंत्र्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. 

 श्रेय घेण्याच्या या मंत्र्यांच्या भूमिकेवर आणि सरकारच्या मदतीबाबतच्या  निकषांबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र टीका केली आहे . सरकारचे मदतीचे हे नवीन निकष म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे मदत द्यायची असेल तर ती जाहीर करून शेतकरी प्रेमाचे खोटे प्रदर्शन करण्यापेक्षा एकाच टप्प्यात मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे

बीड जिल्ह्याला बोंड अळीचा नुकसानभरपाईसाठी 256 कोटी रुपये मंजूर झाली असताना प्रत्यक्षात केवळ 85 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत उर्वरित निधी केव्हा मिळणार असा सवालही त्यांनी केला आहे . जिल्ह्याला मिळालेल्या मदतीचे श्रेय घेणाऱ्यांना स्वतःच्या परळी विधानसभा मतदारसंघातील परळी अंबाजोगाई तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत का मिळू  शकली नाही असा सवालही त्यांनी केला आहे. 

फसवे पॅकेज ; 37 हजार 500 रु कुठे आहेत - धनंजय मुंडे

सरकारने बोंडअळीग्रस्त शेतक-यांना 37 हजार 500 रुपयाचे पॅकेज जाहीर केले होते.  प्रत्यक्षात विमा कंपन्यांनी  अद्याप मदत दिलेली नाही,  पिक विमा कंपन्यांनी न्यायालयात जाऊन मदत देणार नाही अशी भूमिका घेतली आहे NDRF च्या  निकषानुसार शेतकऱ्यांना केवळ 2000 रुपये ही मदत मिळणार आहे .  जाहीर केलेले 37 हजार 500 रुपयांचे पॅकेज कुठे आहे असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे . असे पॅकेज जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

बोगस बी. टी. बियाणे उत्पादक कंपनी विरोधात का कारवाई केली नाही ? शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची शासन का पाठराखण करत आहेत ? यामागचे गौडबंगाल काय आहे, हे सुद्धा जनतेला कळले पाहिजे....

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्याचे श्रेय  कसले घेता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.


No comments:

Post a Comment