तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

बर्गरमध्ये प्लॅस्टीक, अन्ननलिकेला जखम झाल्याने ग्राहक रुग्णालयात.

बर्गर खाण्याचा शौक एका ग्राहकाला महागात पडला असून, या बर्गरमुळे त्याची रवानगी थेट रुग्णालयात करण्यात आली. दिल्लीतील राजीव नगर मेट्रो स्टेशनवर असलेल्या बर्गर किंगच्या दुकानातून या ग्राहकाने बर्गर विकत घेतला होता. तो खाल्ल्याने त्याच्या अन्ननलिकेला चिरा पडल्या. बर्गर खाऊन झाल्यानंतर अत्यस्वस्थ वाटायला लागल्याने या ग्राहकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राकेश कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने बर्गर किंगच्या दुकानातून व्हेज चीजबर्गर विकत घेतला होता. बर्गर खात असताना त्याला न चावता येणारी गोष्ट आपण खात असल्याचा मध्येच भास झाला. प्रत्यक्षात तो भास नव्हता तर, राजीवने विकत घेतलेल्या बर्गरमध्ये प्लॅस्टीक असल्याने त्याला ते नीट चावता आलं नव्हतं. राजीवने तो घास तसाच गिळला, गिळत असताना प्लॅस्टीकमुळे त्याच्या अन्ननलिकेला इजा झाली ज्यामुळे त्याला भयंकर अस्वस्थ वाटायला लागलं होतं.राजीव कुमार याने रुग्णालयातून सुट्टी मिळताच तातडीन पोलिसांत तक्रार केली, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बर्गर किंगच्या व्यवस्थापकला अटक केली. न्यायालयासमोर या व्यवस्थापकाला हजर केलं असता त्याला जामिनावर सोडण्यात आले.

No comments:

Post a Comment