तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

गंगापुर प्रतिनिधी,
  स्वराज्य रक्षक संभाजी महाराज  यांची ३६१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील छत्रपती  शिवाजी महाराज चौकात दि १४ मे सोमवारी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या .
       यावेळी स्वाभिमानी चे तालुका अध्यक्ष संपत पाटील रोडगे,प्रहारचे उप जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब शेळके पाटील ,संभाजी ब्रिगेड चे उप जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात,अविनाश शिंदे,बाळासाहेब जाधव बाबासाहेब खंडागळे, राहुल पारखे,रामचंद्र एव्हनडे,,हनुमान चोथे,कलीम पठाण,यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment