तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

शेतमाल प्रक्रिया व  निर्यातीकडे युवा शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे.


माखणी येथे शेतीसेवा ग्रुपच्या बैठकीत अँड. पवार यांचे आवाहन.

ताडकळस/प्रतिनिधी

दि. 13 मे, या भागात पिकणाऱ्या दर्जेदार  कृषी उत्पादनांना देश-विदेशात मोठी मागणी असून, या क्षेत्रातील संधी शोधुन युवा शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया व  निर्यातीकडे लक्ष देण्याचे आवाहन जेष्ठ प्रयोगशिल शेतकरी अँड. गंगाधर (दादा) पवार यानी केले. ते येथुन जवळच असलेल्या माखणी (ता.पुर्णा) येथे शेतीसेवा ग्रुप पुर्णाच्या मासीक बैठकीत समारोपीय मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी परभणी जि.प.चे सदस्य डाँ. सुभाष कदम, अॅड रमेशराव गोळेगावकर, पुर्णा तालुका कृषी अधिकारी खुपसे पाटील, संभाजीराव भोसले आदीची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना अँड. पवार म्हणाले की, कृषी माल निर्यात क्षेत्रात वेगवेगळ्या संधीसह शासनाच्या विविध प्रोस्तानात्मक योजना असुन युवा शेतकऱ्यांनी याबाबीचे तंत्र अवगत करुन दर्जेदार उत्पादनासह प्रक्रिया व पँकेजिंग करुन शेतमाल निर्यात करुन स्वताची आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्रारंभी प्रधानमंत्री पीक विमा योजने बाबत जि. प. सदस्य डॉ. सुभाष कदम यानी पीक विमा मिळण्यासाठी मूलभूत असणाऱ्या पिक आणेवारी समिती, पीक कापणी प्रयोग समिती, पीक प्रयोगाचा अहवाल आदी विषयावर आभ्यास पुर्ण मार्गदर्शन करुन या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी सजग राहणे महत्वाचे असल्याचे मत मांडले तसेच धारासुर परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी विमा कंपनीने नाकारलेला विमा आंदोलन करुन मिळवल्याची माहिती दिली. पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना नाकरलेला विमा मिळवण्यासाठी आंदोलन व आवश्यकते प्रमाणे न्यायलयीन लढा लढण्याचा निर्धार यावेळी मार्गदर्शन करतांना अॅड रमेशराव गोळेगावकर व्यक्त केला. बैठकीत तालुका कृषी अधिकारी श्री .खुपसे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय कृषी संजीवनी योजनेची सविस्तर माहिती देऊन. पुर्णा तालुक्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेसाठी निवडलेल्या ११ गावात समित्या स्थापन करुन आपल्या गावच्या शेतीचा सार्वागिन विकास करण्यासाठी, उत्पादन वाढण्यासाठी गावोगावी समिती स्थापन करून शेती विकासाचा आराखडा त्वरीत कृषी भागाकडे सादर करण्याचे आवाहन श्री.खुपसे यानी केले. शेतीसेवा ग्रुपची पुढील बैठक देऊळगाव दुधाटे (ता. पुर्णा)  येथे दि.१०/६/२०१८, रविवार रोजी आयोजित केल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

बैठकीचे सुत्रसंचालन शेतीसेवा ग्रुपचे प्रताप काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक जनार्धन आवरगंड यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

बैठक यशस्वीतेसाठी जनार्धन आवरगंड, विक्रम आवरगंड, गोविंदराव दुधाटे, मधुकरराव जोगदंड, रुषीकेश सकनुर, संभाजी शिराळे आदीनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास माखणी, फुलकळस, धानोरा काळे, देऊळगाव, लिमला, देवठाणा, झाडगाव, माहेर आदी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment